chakrata hotels : उत्तराखंडमधील चकराता या पर्यटनस्थळी कोणकोणत्या हॉटेल्समध्ये राहाल?

110
chakrata hotels : उत्तराखंडमधील चकराता या पर्यटनस्थळी कोणकोणत्या हॉटेल्समध्ये राहाल?

चक्रता किंवा चकरौता हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील डेहराडून जिल्ह्यात स्थित एक शहर आहे. २११८ मीटर (६९४९ फूट) उंचीवर वसलेले हे ठिकाण केवळ पर्वतीय पर्यटन स्थळच नाही तर छावणी देखील आहे. चक्रता हे शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी ओळखले जाते. हे शहर डेहराडूनपासून ९८ किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी चकराता हे अतिशय योग्य ठिकाण आहे. (chakrata hotels)

चाकरता येथे दूरवर पसरलेल्या घनदाट जंगलात जौनसरी जमातीची आकर्षक गावे आहेत. हे शहर उत्तर पश्चिम उत्तराखंडच्या जौनसार बावर प्रदेशात येते. असे म्हटले जाते की चकराताची स्थापना कर्नल ह्यूम आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी केली होती. येथील वातावरण पाहून इंग्रजांनी या जागेचा उन्हाळी सैन्य तळ म्हणून वापर केला. सध्या येथे लष्कराच्या जवानांना कमांडोचे प्रशिक्षण दिले जाते. (chakrata hotels)

आता अशा सुंदर आणि निसर्गसंपन्न स्थळाला भेट द्यायची असेल तर चांगल्या हॉटेलमध्ये राहिलं पाहिजे. जेणेकरुन तुम्ही फिरुन आल्यावर तुम्हाला आराम करता येईल, निवांत वेळ घालवता येईल आणि सकाळी ताजेतवाने वाटेल. चला तर आपण काही उत्तम हॉटेल्सबद्दल जाणून घेऊया. (chakrata hotels)

१. पिनासी रिसॉर्ट

या रिसॉर्टमध्ये उत्कृष्ट आदरातिथ्य केले जाते आणि इथले वातावरण देखील अत्यंत प्रसन्न आहे.

२. ग्रीन हेवन रिसॉर्ट

या हॉटेलचे वैशिष्ट्य असे की इथल्या रुम्सच्या खिडकीतून तुम्हाला सुंदर दृश्ये दिसतील. जेणेकरुन हॉटेलमधूनही तुम्ही नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. त्यांच्या सेवा आणि सुविधाही उत्तम आहेत.

३. ब्लू कॅनव्हास रिसॉर्ट

हे रिसॉर्ट अतिशय निसर्गरम्य आहे आणि चकरातामधील प्रेक्षणीय स्थळे इथून खूपच जवळ आहेत. त्यामुळे तुमचा प्रवासही सुखकर होतो.

(हेही वाचा – amity university mumbai : एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई या विद्यापीठाची निवड का करावी? काय आहे एमिटी युनिव्हर्सिटीची खास बात?)

४. हॉटेल ब्युरान्स

नयनरम्य वातावरणात स्थित हे हॉटेल कुटुंब आणि निसर्ग प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. इथलं नैसर्गिक वातावरण तुम्हाला खिळवून ठेवतं आणि तुम्हाला इथे परिपूर्ण सेवेचा आनंद घेता येतो.

५. हॉटेल चकराता होम्स

नावातंच चकराता असल्यामुळे हे हॉटेल खास आहे. आजूबाजूच्या टेकड्यांचे विस्मयकारक दृश्य तुम्ही येथून पाहू शकता.

६. बाबुताल रिसॉर्ट

तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाता तेव्हा ३ गोष्टी गोष्टी महत्त्वाच्या असतात. अन्न, सेवा आणि सुविधा. या तीनही घटकांनी परिपूर्ण असलेले हे हॉटेल आहे. त्यामुळे चकरातामध्ये आलात तर बिनधास्त या हॉटेलची बुकिंग करा.

७. रिसॉर्ट प्रकृती अनविंड

सुंदर टेकड्या आणि पर्वतांनी वेढलेले हे हॉटेल कुटुंबासाथी एक आदर्श गंतव्य आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे अनेक गोष्ट आहेत. तसेच प्रौढांच्या मनोरंजनाची सोयही करुन ठेवलेली आहे.

८. हॉस्टेलर चकराता

कॅफे, इनडोअर गेम्स आणि बरेच काही. हे केवळ एक हॉटेल नसून हा सुविधांचा खजाना आहे. तुमच्या हॉटेल्सच्या खोल्यांमधून तुम्हाला रमणीय दृश्ये दुसतील, त्यामुळे तुमचं मन शांत आणि तल्लीन राहिल. त्याचबरोबर इथे अनेक क्रियाकलाप होत असल्यामुळे तुमचा दिवसही सहज आनंदात निघून जाईल. (chakrata hotels)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.