मरीन ड्राईव्ह हा मुंबईतल्या नेताजी सुभाषचंद्र बोस रोडच्या बाजूला असलेला ३ किलोमीटर लांबीचा फेरफटका मारण्यासाठी तयार करण्यात आलेला फुटपाथ आहे. पल्लोनजी मिस्त्री यांनी हा रस्ता आणि फेरफटक्यासाठी फुटपाथ म्हणून बांधला होता. हा संपूर्ण रस्ता केळीच्या आकाराचा आहे. अरबी समुद्राला जोडल्या गेलेल्या खाडीच्या किनाऱ्यावर तयार केलेला हा सहा लेनचा काँक्रिटचा रस्ता आहे. (marine drive beach)
मरीन ड्राईव्हच्या उत्तरेला गिरगाव चौपाटी आहे. त्यालगतचा रस्ता नरीमन पॉइंटच्या दक्षिणेकडील टोकाला, बाबुलनाथ आणि उत्तरेकडील मलबार हिलला जोडलेला आहे. मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हणूनही संबोधलं जायचं. कारण, रात्रीच्या वेळी मरीन ड्राइव्हच्या बाजूने कुठल्याही उंच ठिकाणावरून पाहिलं तर, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट्स गळ्यातल्या मोत्यांच्या हारासारखेच दिसतात. (marine drive beach)
(हेही वाचा – amity university mumbai : एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई या विद्यापीठाची निवड का करावी? काय आहे एमिटी युनिव्हर्सिटीची खास बात?)
या रस्त्याचं अधिकृत नाव नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता असं आहे. फेरफटका मारण्यासाठी तयार केलेल्या फुटपाथवर पामच्या झाडांची रांग लावलेली आहे. मरीन ड्राइव्हच्या उत्तरेला चौपाटी बीच आहे. इथे तुम्ही आपल्या प्रियजनांसोबत भेळपुरी, चाट आणि इतर स्थानिक फास्ट फूडचा आनंद घेऊ शकता. हे मुंबईमधलं प्रचंड लोकप्रिय ठिकाण आहे. इथे रस्त्याच्या कडेला कित्येक रेस्टॉरंट्सही आहेत. इथून पुढे जवळच वाळकेश्वर हा शहराचा एक उच्चभ्रू परिसर आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यपालांचं निवासस्थान आहे. (marine drive beach)
या भागात श्रीमंत उद्योजक पारसींनी उभारलेल्या अनेक इमारती आर्ट डेको शैलीत बांधल्या गेल्या होत्या. या इमारती १९२० आणि १९३० सालच्या दशकामध्ये अतिशय लोकप्रिय होत्या. मरीन ड्राईव्हवरच्या सर्वात जुन्या आर्ट डेको इमारतींपैकी कपूर महल, झवेर महल आणि केवल महल या इमारती १९३७ ते १९३९ सालादरम्यान एकूण १ दशलक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आल्या होत्या. (marine drive beach)
(हेही वाचा – chakrata hotels : उत्तराखंडमधील चकराता या पर्यटनस्थळी कोणकोणत्या हॉटेल्समध्ये राहाल?)
एस्प्लेनेडच्या बाजूने रिअल इस्टेटच्या इमारती जास्त आहेत. याव्यतिरिक्त अनेक हॉटेल्सही मरीन ड्राईव्हवर आहेत. त्यांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे ५स्टार ओबेरॉय हॉटेल आहे. या हॉटेलचं जुनं नाव ओबेरॉय हिल्टन टॉवर असं होतं. पण २००८ सालच्या सुरुवातीला त्याचं अगदी सुरुवातीचं मूळ नाव परत ठेवण्यात आलं. याव्यतिरिक्त द इंटरकॉन्टिनेंटल, हॉटेल मरीन प्लाझा, सी ग्रीन हॉटेल आणि आणखीही इतर लहान हॉटेल्स इथे आहेत. मरीन ड्राईव्ह हा रस्ता नरिमन पॉईंट आणि उर्वरित शहराच्या मध्यवर्ती कमर्शियल जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. (marine drive beach)
कित्येक स्पोर्ट्स क्लब, काही क्रिकेट स्टेडियम आणि क्लब ग्राउंड मरीन ड्राईव्हच्या पलीकडे बांधलेले आहेत. त्यांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), ब्रेबॉर्न स्टेडियम, हिंदू जिमखाना मैदान आणि गरवारे क्लब हाऊस, शेजारीच असलेलं प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम, तसेच मुंबई पोलीस जिमखाना, हिंदू जिमखाना, पारसी जिमखाना हे क्लब फक्त तिथल्या सदस्यांसाठीच खुले असतात. (marine drive beach)
(हेही वाचा – Kelva Beach : मुंबईजवळील केळवा बीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थान )
१९५० सालच्या दशकामधल्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुरैया या इथल्या कृष्णा महाल या इमारतीत १९४० पासून ते २००४ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत तळमजल्यावरील अपार्टमेंटमध्ये शाह कुटुंबाच्या भाडेकरू म्हणून राहत होत्या. तसंच १९४० आणि ५० सालच्या दशकांत नर्गिस आणि राज कपूर यांसारखे इतर अनेक चित्रपट कलाकार मरीन ड्राईव्हच्या जवळपास राहत होते. (marine drive beach)
२०१२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेने ७२ वर्षांनंतर हा संपूर्ण रस्ता पुन्हा तयार केला. अपघात किंवा हल्ले रोखण्यासाठी कुठलीही सिक्युरिटी त्यावेळी नव्हती. म्हणून रस्त्यावर अनेक बोलार्ड बसविण्यात आले आणि इतरही कडक सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्यात आले. (marine drive beach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community