मंत्र्यांच्या PA ना खुणावत आहे विधिमंडळ इमारत

174
मंत्र्यांच्या PA ना खुणावत आहे विधिमंडळ इमारत

लोकसभा निवडणूक होताच राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांमध्ये इच्छूक उमेदवारांमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे.विद्यमान आमदारांसोबत प्रशासनात काम केलेले अधिकारी तसंच मंत्र्यांच्या स्विय सहाय्यकांनी (PA) देखील निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. (PA)

राज्यातील मंत्री, आमदार, राजकीय नेते यांची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी नवी नाही. पण आता काही मंत्र्याचे स्विय सहायक आणि विशेष कार्यकारी अधिकारी हे विधानसभेचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना विधिमंडळ इमारत खुणावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे खासगी सचिव राहिलेले बालाजी खतगावकर नांदेड जिल्ह्यात मुखेड विधानसभा येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. (PA)

(हेही वाचा – Accident News : जालन्यात भीषण अपघातात मायलेकीसह चौघांना धडक, चालक फरार)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचे ओएसडी राहिलेल सुमित वानखेडे वर्धा जिल्ह्यात आर्वी येथून इच्छुक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४-२०१९ त्यांचे स्वीय सचिव राहिलेले अभिमन्यू पवार यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. ते सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. वानखेडे देखील अभिमन्यू पवार यांचं अनुकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. (PA)

भाजपा आमदार महेश लांडगे यांचे पीए सोमेश वैद्य सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. भाजपाचेच सुभाष देशमुख सध्या या मतदासंघाचे आमदार आहेत. अशाप्रकारे इतरही काही आमदारांचे स्विय सहाय्यक देखील आहेत त्यांना आमदारकीची स्वप्न आतापासूनच पडायला लागली आहेत. (PA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.