Maharashtra Assembly Election : भूपेंद्र यादव महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार

148
Maharashtra Assembly Election : भूपेंद्र यादव महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार
  • वंदना बर्वे

लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही याची खास खबरदारी भारतीय जनता पक्षाकडून घेतली जात आहे. स्वपक्षातील नेत्यांची उपेक्षा, चुकीचे तिकीट वाटप आणि आयातीत नेत्यांना प्राधान्य या तीन गोष्टीमुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त फटका बसला होता. मात्र, आता महाराष्ट्रासारखे राज्य हातून जाईल अशी कोणतीही चूक भाजपा हायकमांडला होऊ द्यायची नाही आहे. (Maharashtra Assembly Election)

भाजपातील उच्चस्तरीय सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप हायकमांड मुख्य भूमिकेत राहणार आहे. याचा अर्थ असा की, महायुतीतील मित्रपक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा आणि त्याचा निर्णय, उमेदवारांची निवड, स्थानिक नेत्यांचा कौशल्यनिहाय उपयोग आणि निवडणूक प्रचाराचे मुद्ये आदी सर्व गोष्टींचा निर्णय हायकमांडकडून घेतला जाईल. (Maharashtra Assembly Election)

भाजपासाठी महाराष्ट्र खूप महत्त्वाचे राज्य आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या निवडणुकीत होऊ द्यायची नाही. कदाचित म्हणूनच, भाजपाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्राच्या निवडणूक प्रभारीपदी निवड केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी बनविण्यात आले आहे. यादव हे गृहमंत्री अमित शहा यांच्या निकटचे मानले जातात, हे येथे विशेष. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय नेत्यांऐवजी त्या त्या समाजातील नेत्यांशी चर्चा करा; Uddhav Thackeray यांचे आवाहन)

निवडणूक प्रभारी म्हणून राज्यांची निवडणूक जिंकण्यात भूपेंद्र यादव यांचा एक वेगळा इतिहास आहे. २०१२ मध्ये यादव राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. यानंतर २०१४ मध्ये भाजपाच्या महासचिवपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. यादव यांना २०१३ मध्ये राजस्थानमध्ये निवडणूक प्रभारी बनविण्यात आले होते. यानंतर २०१४ मध्ये झारखंड, २०१७ मध्ये गुजरात आणि उत्तरप्रदेश, २०२० मध्ये बिहार आणि २०२३ मध्ये मध्यप्रदेशमध्ये निवडणूक प्रभारी बनविण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाला यशाच्या शिखरावर पोहचविले होते. (Maharashtra Assembly Election)

सत्ताधारी पक्षासाठी महाराष्ट्र खूप महत्त्वाचे राज्य आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या निवडणुकीत होऊ द्यायची नाही. कदाचित म्हणूनच, भाजपाने भूपेंद्र यादव यांना आता महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यामुळे ते दिल्लीत दिसून येतात. मात्र, अधिवेशन संपताच यादव महाराष्ट्राकडे कूच करणार आहेत आणि निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रातच तंबू गाडून राहणार आहेत, अशी माहिती सूत्राने दिली आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.