Aaditya Thackeray Pune : नेटकऱ्यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले; ‘सेना आता मराठी लोकांचा पक्ष नाही का?’

199
Sushant Singh Rajput Death Case : काँग्रेसने आदित्य ठाकरे यांच्या जखमेवरील खपली काढली

उबाठा नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा इंग्रजी भाषेत ‘X’ वर पोस्ट करत पुणे पुराच्या विषयाचे राजकारण करायचा प्रयत्न केला आणि ट्रोल झाले. नेटकऱ्यांनीही त्यांना इंग्रजीत प्रश्न विचारून ट्रोल केलेच तर एकाने ‘सेना आता मराठी लोकांचा पक्ष नाही का?’ असा थेट सवाल केला. (Aaditya Thackeray Pune)

अजित पवारांची भेट

गेल्या गुरुवारी २५ जुलैला पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि काही शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सामान्य राहिवाश्यांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली आणि लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली आणि उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. (Aaditya Thackeray Pune)

पुण्यातही ‘गुजरात’ संबंध जोडला; उघडे पडले

त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनीही नुकसान झालेल्या रहिवासी सोसायटीला भेट देऊन राहिवाश्यांशी चर्चा केली आणि समस्या जाणून घेतली. त्यावर लगेचच आदित्य ठाकरे यांनीही एक पोस्ट ‘X’ वर केली. ‘पुण्यातील अचानक आलेला पूर हे सत्ताधारी-बिल्डरच्या संगनमताने आणि पुण्यातील नद्यांचे प्रवाह समजून न घेता गुजरातमधील एका वास्तुविशारदाचे साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मॉडेल जसेच्या तसे राबविण्याचा प्रयत्न रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केला,’ असा आरोप केला. २०० पेक्षा अधिक शब्दांची ही इंग्रजीतील पोस्ट असून त्यावर नेटकऱ्यांनी त्यांनाच प्रतिप्रश्न करून उघडे पाडले. (Aaditya Thackeray Pune)

(हेही वाचा – Manoj Jarange-Patil यांच्या नसा-नसांत अहंकार, गर्व आलाय; प्रविण दरेकरांनी सुनावले)

विरोधात बसून आरोप करणे सोपे

एका व्यक्तीने ठाकरे यांनाच सुनावत ‘तुम्ही पुणे आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच विकास कामांना सातत्याने विरोध करत आला आहात. विरोधात बसून केवळ आरोप करणे सोपे असते’ असे उत्तर दिले. तर एकाने ‘या विषयाचे राजकारण करू नका’ असा सल्ला देत ‘रिव्हरफ्रंट सुशोभीकरण आणि पाणी भरायचा काही संबंध नाही. जिथे बांधकामाला परवानगी नाही अशा ठिकाणी बांधकाम केल्याने पाणी भरले,’ असे निदर्शनास आणून दिले. (Aaditya Thackeray Pune)

एवढी सेना लाचार झाली..

एका मराठीप्रेमी नेटकाऱ्याने मराठीचा मुद्दा उपस्थित केला. ‘तुमचे मतदार मराठी आहेत की इंग्रज, सेना आता मराठी लोकांचा पक्ष नाही का? उठसूट इंग्लिशमधून ट्विट करता? मराठीतून ट्विट करायला कमीपणा वाटतो का? उद्या भैया लोकांच्या भाषेत ट्विट करायला पण मागेपुढे बघणार नाही, एवढी सेना लाचार झाली आहे,’ असे एका मराठी माणसाने सुनावले. (Aaditya Thackeray Pune)

एकाने तर, ‘बारक्या तुला वरळीच्या अडचणी सोडवता येत नाहीत, पुण्याच्या गप्पा कशाला मारतो, पुणेकर समर्थ आहेत, त्यांच्या अडचणी सोडवायला,’ अशा शब्दांत हटकले. (Aaditya Thackeray Pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.