सध्या काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे येनकेन प्रकारेण जातीय जनगणनेचा मुद्दा पुढे रेटत आहेत. संसदेत अर्थसंकल्पावर भाषण करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना सरकारने अर्थसंकल्प बनवताना जे अधिकारी नेमले त्यामध्ये आदिवासी आणि ओबीसी नव्हते केवळ उच्च वर्णियांचीच निवड केली होती, अशी टीका केली. त्याचा संदर्भ घेत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ज्यांना स्वतःची जात माहित नाही, ते जातीय जनगणनेची मागणी करत आहेत, अशा शेलक्या शब्दांत टीका केली. त्यानंतर मात्र राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचा तिळपापड झाला.
संसदेच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी मंगळवारी भाजपा खासदार अनुराग ठाकूर, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यात अग्निवीर आणि जातीय जनगणनेवरून खडाजंगी झाली. राहुल गांधींचे नाव न घेता अनुराग ठाकूर म्हणाले, तुम्हाला बोलायला स्लिप येते. उधार घेतलेल्या बुद्धीने राजकारण करता येत नाही. असत्याला पाय नसतात आणि ते काँग्रेस पक्षाच्या खांद्यावर स्वार होते, जसा बाजीगराच्या खांद्यावर माकड असते. राहुल गांधी यांच्या खांद्यावर खोट्याचा पोशाख आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. यानंतर सभागृहात गोंधळ वाढला, त्यामुळे सभापतींनी राहुल गांधींना अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना उत्तर देण्याची परवानगी दिली.
(हेही वाचा उत्तर प्रदेश विधानसभेत Love Jihad विधेयक मंजूर; आरोपीला आता जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद)
त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ करून अपमान केल्याचा आरोप केला. पण मला त्यांच्याकडून माफीची गरज नाही. प्रत्यक्षात मंगळवारी जगदंबिका पाल सभागृहात सभापतींच्या खुर्चीवर बसल्या होत्या. राहुल गांधींवर निशाणा साधत अनुराग ठाकूर म्हणाले, ‘त्यांना हे माहित असले पाहिजे की एलओपीचा अर्थ विरोधी नेता आहे, प्रचाराचा नेता नाही. काँग्रेस पक्षाने मोठा भ्रष्टाचार केला आहे, असेही ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले.
Join Our WhatsApp Community