विश्व कसोटी अंतिम सामन्यात भारतासमोर न्यूझीलंड बनले मोठे आव्हान! 

न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडसारख्या संघाला मैदानात 2 कसोटी सामन्याच्या सिरीजमध्ये १-० ने पराभूत करत विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने भारताला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

185

काही दिवसांतच विश्व कसोटी अंतिम सामन्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल) ला सुरुवात होणार आहे. त्याकरता भारत आणि न्‍यूझीलंड हे दोन्ही संघ सज्ज आहेत. मात्र यामध्ये भारतासमोर न्यूझीलंड मोठे आव्हान बनले आहे. कारण न्यूझीलंडने इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच मैदानात पराभूत केले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी अंतिम सामना महत्वाचा ठरणार आहे.

(हेही वाचा : कडक नियमावलीत होणार भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा!)

न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडसारख्या संघाला मैदानात 2 कसोटी सामन्याच्या सिरीजमध्ये १-० ने पराभूत करत विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने भारताला एक प्रकारे इशाराच दिला आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णयीत ठरल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल ८ गडी बाद करून इंग्लंडला हरवून विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कडवी झुंज दिल्यावर न्यूझीलंडने सामना अनिर्णीत केला. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना सुरुवातीला चुरशीचा झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ३०३ धावा केल्या, ज्याच्या उत्तरात न्यूझीलंडने ३८८ धावा करत ८५ धावांची लीड घेतली. ज्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडला अवघ्या १२२ धावांवर ऑलआऊट केले. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ ३८ धावांची गरज होती. ज्या न्यूझीलंडने १०.५ ओव्हरमध्ये दोन विकेटच्या बदल्य़ात पूर्ण करत सामना आपल्या नावे केला.

न्यूझीलंडला कमी लेखणे महागात पडेल! 

इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर न्‍यूझीलंडच्या संघात कर्णधार केन विल्यमसनसह बरेच महत्त्वाचे खेळाडू नव्हते. तरी देखील इंग्लंडला हरवल्यानंतर भारतीय संघाला आता न्यूझीलंड विरोधात अत्यंत कुशलतेने व्यूहरचना रचून त्याला अप्रतिम खेळ दाखवावा लागणार आहे. त्यासाठी खेळपट्टीचा योग्य अभ्यास करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.