Ind vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० मध्ये सुपर ओव्हरमधील विजयासह भारताने मालिकाही ३-० ने जिंकली 

Ind vs SL, 3rd T20 : २ बाद ११० नंतर श्रीलंकेनं हा सामना गमावला

195
Ind vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० मध्ये सुपर ओव्हरमधील विजयासह भारताने मालिकाही ३-० ने जिंकली 
Ind vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० मध्ये सुपर ओव्हरमधील विजयासह भारताने मालिकाही ३-० ने जिंकली 
  • ऋजुता लुकतुके

केवळ कप्तानीसाठी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) सामनावीराचा पुरस्कार द्यावा असा विजय आपल्या गोलंदाजीतील बदल आणि क्षेत्ररक्षणातील व्यूहरचनेतून त्याने खेचून आणला. अर्थात, लंकन फलंदाजांची हाराकिरीही त्यासाठी अवलंबून होती. कारण, विजयासाठी १३८ धावांची गरज असताना आणि १५व्या षटकांत २ बाद ११० अशी अवस्था असताना लंकन फलंदाजांनी हा सामना गमावलाच कसा, याचं उत्तर त्यांच्याकडेही नसेल. (Ind vs SL, 3rd T20)

(हेही वाचा- Infiltrating India : बांगलादेशी यू ट्यूबरनेच दाखवले घुसखोरीचे मार्ग; व्‍हिडिओमुळे खळबळ)

२ बाद ११० नंतर पुढच्या २८ चेंडूंत लंकन फलंदाजांनी फक्त २७ धावा करताना तब्बल ६ फलंदाज गमावले. त्यामुळे निर्धारित २० षटकांत सामना बरोबरीत राहिला. सुपर ओव्हरचा आसरा घ्यावा लागला. इथंही षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर कुसल परेरा (Kusal Perera) आणि निसांका हे मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाले. भारतासमोर विजयासाठी फक्त ३ धावांचं लक्ष्य उभं ठाकलं. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्याच चेंडूवर चौकार मारत लक्ष्य पूर्ण केलं. (Ind vs SL, 3rd T20)

अशा पद्धतीने अगदी गमावलेला सामना भारतीय संघाने जिंकला. सामन्यात २५ धावा आणि सुपर ओव्हरमधील २ बळींसह एकूण ४ बळी मिळवणारा वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) सामनावीर ठरला. भारतीय संघाने टी टी-२० मालिकाही ३-० ने खिशात घातली. (Ind vs SL, 3rd T20)

 पल्लिकलच्या खेळपट्टीवर चेंडू धिम्या गतीने येत होता. त्याचा परिणाम दोन्ही संघांच्या फलंदाजांवर झाला. भारतीय खेळाडू आपले नेहमीचे आक्रमक फटके खेळू शकले नाहीत. त्यामुळे पहिली फलंदाजी करताना यशस्वी (Yashasvi), सूर्यकुमार, रिंकू सिंग (Rinku Singh), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अगदी शिवम दुबे (Shivam Dube) हे फलंदाज भारताने १० षटकं संपण्यापूर्वीच गमावले. फलकावर धावा होत्या फक्त ४८. रियान परागने २६ तर वॉशिंग्टन सुंदरने २५ धावा करत भारतीय संघाची पडझड थांबवली. सलामीवीर शुभमन गिलनेही उपयुक्त ३९ धावा केल्या. या तिघांमुळे भारतीय संघ निदान १३० चा टप्पा ओलांडू शकली. (Ind vs SL, 3rd T20)

(हेही वाचा- BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची अखेर बदली; मूळ जागी त्यांना पाठवले)

१३७ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या निसांका (२६), मेंडिस (४३) आणि कुशल परेरा (Kusal Perera) (४६) या पहिल्या ३ फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. श्रीलंकेचा विजय निश्चितच होता. त्यातच खेळपट्टीवर फिरकीपटू प्रभावी ठरत असताना भारताच्या बिश्नोई, सुंदर आणि रियान पराग यांची प्रत्येकी ४ षटकं टाकून झाली होती. अशावेळी सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) पठडीबाहेरचा विचार केला. त्याने रिंकू सिंग आणि नंतर स्वत:ला गोलंदाजी दिली. धिम्या चेंडूंना फटकावणं कठीणच होतं. या दोघांनी आपापल्या षटकांत प्रत्येकी २ बळी मिळवत भारतीय संघाला हातातून भरकटलेला विजय परत मिळवून दिला. (Ind vs SL, 3rd T20)

त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये या मालिकेतील पहिलाच सामना खेळणारा वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) प्रभावी ठरला. भारतीय संघाने चक्क हा सामनाही जिंकला. आता २ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. (Ind vs SL, 3rd T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.