BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची अखेर बदली; मूळ जागी त्यांना पाठवले

10345
BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची अखेर बदली; मूळ जागी त्यांना पाठवले
BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची अखेर बदली; मूळ जागी त्यांना पाठवले
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांच्या बदलीवरून तापलेले वातावरण शांत झाले असे वाटत असतानाच शिंदे यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ सुधाकर शिंदे यांची बदली परत त्यांच्या मूळ जागी करण्यात आली आहे. शिंदे हे मागील आठ वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असून हा कालावधी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात  आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या पुढील प्रतीनियुक्तीचा कालावधी वाढवून देण्यास परवानगी न दिल्याने शासनाकडून त्यांना तात्काळ प्रभावाने मुक्त करण्याचा निर्णय घेत त्यांना  त्यांच्या मूळ विभागात पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे बुधवारी अतिरिक्त आयुक्त पदाचा भार आयुक्तांकडे सोपवून त्यांना आपल्या मूळ विभागात परतावे लागणार आहे. (BMC)
 डॉ सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) हे  अंतर्गत महसूल सेवेतील अधिकारी असून ते २४ नोव्हेंबर  २०१५ महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. त्यांचा  ०८ वर्षांचा मंजूर प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ हा २३ नोव्हेंबर २०२३  रोजी संपला आहे.  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, मनुष्यबळ विकास संचालनालय, वित्त मंत्रालय/महसूल विभागाने कळविले आहे की  मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने  त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२३ नंतर वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. त्यानुसार त्यांना या शासनाकडून तत्काळ प्रभावाने मुक्त करण्यात येत आहे.  आपण आपला सध्याचा कार्यभार मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सोपवून ३१ जुलै २०२४  पर्यंत आपल्या  मूळ केडरमध्ये सामील व्हावे असे त्यांच्या बदली आदेशात म्हटले आहे. (BMC)
Untitled design 2024 07 31T075212.660
उबाठा (UBT) शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी विधींडळात डॉ सुधाकर शिंदे याच्या प्रतिनियुक्तीबाबत मुद्दा उपस्थित करून या एकाच अधिकाऱ्यावर राज्य सरकार मेहरबान का असा सवाल उपस्थित केला होता. राज्यात येण्यासाठी १२ सनदी अधिकारी हे प्रतीक्षेत असताना शिंदे यांच्यावर सरकार मेहरबान झाले असून राज्यात  २०१५मध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या सुधाकर शिंदे यांना आता नोव्हेंबर २०२९ पर्यंत वाढ देण्याची सूचना केल्याचा गौप्यस्फोटच प्रभु यांनी केला होता. तसेच त्या पूर्वी मोहित कंबोज यांनी एक्स वर   शिदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले होते आणि काही मिनिटात ही पोस्ट काढून टाकली होती. (BMC)
दरम्यान महापालिकेत २ जून २०२३ मध्ये मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ सुधाकर शिंदे यांनी प्रत्येक रुग्णालय भेट देत तेथील शिस्त आणण्याचा प्रयत्न केला होत. त्याच दरम्यान मुंबई स्वच्छ अभियान राबवण्याची मोहीम त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या स्वच्छता मोहिमे नंतर शिंदे यांचे आरोग्य विभागातील लक्ष कमी झाले होते. दरम्यान शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या मानधनात दहा हजारांनी वाढ करण्याचा महत्व पूर्ण निर्णय आपल्या या कारकीर्दीत घेतला.  (BMC)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.