हमासचा प्रमुख Ismail Haniyeh चा खात्मा; तेहरानमध्ये झाली हत्या

199
हमासचा प्रमुख Ismail Haniyeh चा खात्मा; तेहरानमध्ये झाली हत्या
हमासचा प्रमुख Ismail Haniyeh चा खात्मा; तेहरानमध्ये झाली हत्या

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये (Israel) तणाव निर्माण झाला होता. आता एक मोठी बातमी समोर आली असून इराणच्या तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाची (Ismail Haniyeh) हत्या करण्यात आली आहे. तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं होतं. या वेळी झालेल्या स्फोटात हमास (Hamas) प्रमुख इस्माइल हानिया आणि त्यांच्या एका रक्षकाचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल..!)

इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमास ही आतंकवादी संघटना चर्चेत आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एका निवेदनात या संदर्भात माहिती दिली आहे. इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात इस्माईल हानिया आणि त्याच्या एका रक्षकाच्या मृत्यूला हमासने इस्रायल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला बुधवारी सकाळी झाला. याची आता चौकशी सुरु असून आयआरजीसीने याबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच हमासने हानियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे.

इस्रायलची अद्याप प्रतिक्रिया नाही

हमासचा (Hamas) प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येला इस्रायल जबाबदार असल्याच हमासने म्हटले आहे. याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इस्माईल हानियाचा (Ismail Haniyeh) जन्म १९६२ मध्ये गाझा पट्टीत झाला. पॅलेस्टिनी नेता म्हणून इस्माईल हानियाला ओळखले जात होते. २०१७ मध्ये हमासचे राजकीय ब्युरो म्हणून निवड करण्यात आली होती.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.