हल्ल्यामागचे मुख्य मास्टरमाईंड Raj Thackeray; Amol Mitkari यांचे आरोप…मनसैनिकाच्या मृत्यूने तापले राजकारण

263
हल्ल्यामागचे मुख्य मास्टरमाईंड Raj Thackeray; Amol Mitkari यांचे आरोप...मनसैनिकाच्या मृत्यूने तापले राजकारण
हल्ल्यामागचे मुख्य मास्टरमाईंड Raj Thackeray; Amol Mitkari यांचे आरोप...मनसैनिकाच्या मृत्यूने तापले राजकारण

राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हल्ल्यामागचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच आहेत. माझी लायकी राज साहेबांवर टीका करण्याची नाही, ठीक आहे. मग राज ठाकरे (Raj Thackeray) यांची लायकी आहे का अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करण्याची? मनसैनिकांशी माझे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. ते अशी कृती करूच शकत नव्हते. मात्र कर्णबाळा दुनबळे यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन येथील लोकांना चितावणी दिली. त्यामुळे सदरील प्रकरण घडले, असे खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहेत.

(हेही वाचा – Sarbjyot Singh : ३ दिवसांपूर्वी पदकाची आशा सोडलेली, आज हातात ऑलिम्पिक पदक)

या संदर्भात पोलिसात केलेल्या तक्रारीत देखील त्यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले आहे. मनसैनिकाच्या मृत्यूला कर्णबाळा दुनबळे हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे दुनबळे यांनी देखील मिटकरींना पुन्हा इशारा दिला आहे. मनसैनिक मिटकरींना तुडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असे दुनबळे यांनी म्हटले आहे.

अकोला विश्रामगृहाबाहेर आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मिटकरी यांनी अकोल्यातील सिविल लाईन पोलिसात घटनेबाबत आपला जबाब नोंदवला आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील झालेला हल्ला आणि त्यानंतर मनसैनिकांचा मृत्यू या सर्व प्रकरणावर आता राज्यातील राजकीय वातावरणात चांगलेच तापले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर फरार राहू शकत नसल्याचा आरोपही आमदार मिटकरी यांनी केला आहे.

मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान अकोला येथे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या मृत्यू प्रकरणी अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली असून या मृत्यूसाठी मनसेचे पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

त्यांचा मेंदू घुटण्यात आहे

अमोल मिटकरी यांनी पुढे म्हटले आहे की, मनसेच्या पक्षप्रमुखांनी पुण्यामध्ये येऊन अजित दादांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी त्यांच्या टीकेला उत्तर दिले. माझ्या उत्तरात कुठेही त्यांचे नाव नव्हते. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ओढून घेतले आणि त्यांनी हा राडा केला. त्यांच्या या राड्यामुळेच माझ्या तालुक्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मेंदू घुटण्यात आहे, अशा बावळट, निर्बुद्ध, वाईट लोकांसोबत ते वाद केल्यापेक्षा महाराष्ट्राचे हित ज्यामध्ये आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमचे नेते अजित दादांची भूमिका आहे. त्या दृष्टीने काम करायला हवे. त्यामुळे ज्यांना अक्कल नाही त्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही.

मिटकरींना कुत्र्यासारखा मारणार – कर्णबाळा दुनबळे

मिटकरींना कुत्र्यासारखा मारणार, अशी धमकी कर्णबाळा दुनबळे यांनी माध्यमांसमोर दिली आहे. अमोल मिटकरी यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर बोलण्याची लायकी नाही. बोलताना मर्यादा ठेव आणि मर्यादा पाळ. मी कधीच खालच्या स्तरावर बोलणार नाही. मी कोणत्याही प्रकारे त्याचा अपमान केला नाही. मी फक्त त्यांना इशारा देत आहे. आमचा नाद करू नको, आम्ही प्रचंड संयमवादी लोक आहोत. मात्र आमच्याही मर्यादा आहेत, असे कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.