ganesh idol : यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीची कोणती मूर्ती आणाल?

69
ganesh idol : यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीची कोणती मूर्ती आणाल?

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” काही दिवसांतच असा जल्लोष आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे. टाळ आणि मृदुंगाच्या वादनाने महाराष्ट्र दुमदुमणार आहे, लख्ख दिव्यांचा प्रकाश रस्ते उजळून टाकणार आहेत. गणपती बाप्पा हा सर्वांचाच लाडका देव. आतापासूनच सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे.

अनेक जण गणपतीची मूर्ती आत्तापासूनच बुक करतात किंवा आपल्या आवडीप्रमाणे मूर्ती (ganesh idol) बनवून घेतात. जेणेकरुन ऐनवेळी तुमची धावपळ होत नाही. तुम्ही तुमच्या आवडीची मूर्ती बनवली म्हणजेच मूर्तिकाराला सूचना देऊन त्याच्याकडून बनवून घेतली तर तुम्ही लवकर त्या मूर्तीशी कनेक्ट होता.

या लेखात मूर्तीची निवड कशी करावी, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर तशी मूर्ती ठेवल्याने कोणकोणते लाभ होतात, हे देखील सांगणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचा आणि तुमच्या मनासारखी गणपतीची मूर्ती घरी आणा.

(हेही वाचा – palash tree : पलाशचे झाड म्हणजे म्हणजे काय? काय आहेत पलाश झाडाचे फायदे?)

बसलेला गणपती :

प्रत्येक मुद्रेतील गणेशाची मूर्ती वेगवेगळे फळ देते असं म्हणतात. सुखासनात बसलेले गणेश हे शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

नृत्य करणारा गणेश :

गणपतीचे पिता महादेव हे तांडव नृत्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नटराज ही कलेची देवता आहे. तर नृत्याच्या मुद्रेतील गणेश हे ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे.

उजव्या सोंडेचा गणपती :

ही मूर्ती (ganesh idol) अधिक सक्रिय आणि गतिमान उर्जेचे प्रतीक आहे. आलस्य पसरले असेल उजव्या सोंडेचा गणपती नक्कीच आणावा.

डावीकडे वळलेल्या सोंडेचा गणपती :

ही मूर्ती शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक आहेत आणि घरासाठी अधिक शुभ मानली गेली आहे. म्हणजे तुम्ही देवघरासाठी देखील अशी मूर्ती बनवून घेऊ शकता.

पांढरा गणेश :

इंद्राचा हत्ती हा पांढरा असतो. पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती (ganesh idol) घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणते. घरातील नकारात्मक वातावरणावर मात मिळवण्यासाठी गणेशाची पांढरी मूर्ती अवश्य आणा.

(हेही वाचा – ganesh puja decoration : गणपती बाप्पा येणार आहेत लवकरच, मग बाप्पासाठी अशी करा ’सजावट’!)

लाल गणेश :

लाल रंग भडक असला तरी तो शक्तीचा प्रतीक आगे. लाल रंगाची गणेशमूर्ती ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानली जाते.

पिवळा गणेश :

पिवळ्या रंगाची गणेशाची मूर्ती ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे. उच्च शिक्षण घेणार्‍या कुटुंबात ही गणेशाची मूर्ती असायलाच हवी.

काळा गणेश :

काळ्या रंगाची गणेशमूर्ती (ganesh idol) शक्ती आणि देवत्वाचे प्रतीक आहे. वाईट शक्तीवर विजय मिळवण्यामध्ये देखील या रंगाचे वैशिष्ट्य आहे.

तर वाचकहो, आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर यानुसार तुमच्या घरात मूर्ती आणा आणि आम्हाला जरुर कळवा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.