Neeraj Chopra : ‘नमस्कार पॅरिस,’ म्हणत नीरज चोप्रा पॅरिसमध्ये पोहोचला

Neeraj Chopra : नीरजकडून भारताला पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरीची आशा आहे 

173
Neeraj Chopra : ‘नमस्कार पॅरिस,’ म्हणत नीरज चोप्रा पॅरिसमध्ये पोहोचला
Neeraj Chopra : ‘नमस्कार पॅरिस,’ म्हणत नीरज चोप्रा पॅरिसमध्ये पोहोचला
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णाबरोबरच जागतिक अजिंक्यपद सुवर्णही कमावलेला नीरज चोप्रा (Neeraj Chopra) पॅरिस मोहिमेसाठी शहरात दाखल झाला आहे. नीरजने बुधवारी उशिरा पॅऱिसला पोहोचल्या पोहोचल्या आपल्या चाहत्यांना ट्विटरवर त्याची माहिती दिली. ‘नमस्कार पॅरिस! भारताच्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आलो आहे,’ असा संदेश त्याने दिला आहे.

(हेही वाचा- हल्ल्यामागचे मुख्य मास्टरमाईंड Raj Thackeray; Amol Mitkari यांचे आरोप…मनसैनिकाच्या मृत्यूने तापले राजकारण)

भारताचा इतर ॲथलेटिक्स चमू हा मंगळवारी पॅरिसमध्ये आला आहे. तर नीरज एक दिवस उशिरा इथं पोहोचला. ॲथलेटिक्सच्या स्पर्धा ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात होतात. आताही ६ ऑगस्टला नीरजचा मुकाबला असणार आहे. (Neeraj Chopra)

 मंगळवारी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानेही पॅरिस विमानतळावरून एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ‘भारतीय ॲथलेटिक्स चमू पॅरिसला पोहोचला आहे,’ असा मथळा या फोटोला देण्यात आला आहे. ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान ॲथलेटिक्सच्या स्पर्धा पार पडतील. (Neeraj Chopra)

ॲथलेटिक्समध्ये भारताला आशा असेल ती पुन्हा एकदा नीरज चोप्राकडून (Neeraj Chopra). यापूर्वी टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, डायमंड्स लीग या मानाच्या स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही नीरजने सुवर्ण कमावलं आहे. अलीकडे पायाच्या दुखापतीने तो थोडाफार त्रस्त होता. पण, आता ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. नीरजचं उद्दिष्ट आहे ते ९० मीटरचा पल्ला गाठण्याचं. मधल्या दोन वर्षांत युरोपच्या दोन भालाफेकपटूंनी तशी कामगिरी केलेली आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.