manali airport : मनाली विमानतळावर घ्या या सुविधांचा लाभ आणि घ्या अशी काळजी

110
manali airport : मनाली विमानतळावर घ्या या सुविधांचा लाभ आणि घ्या अशी काळजी

हिमाचल प्रदेश हे एक अतिशय सुंदर राज्य आहे. मनाली हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यातील कुल्लू शहराजवळचे एक शहर आहे. हे राज्य पर्यटनासाठी, चित्रपटाच्या शुटिंगसाठी ओळखलं जातं. बाहेरच्या देशातूनही लाखो पर्यटक इथे येतात. म्हणूनच मनाली विमानतळ हे नेहमीच गजबलेलं असतं.

कुल्लू-मनाली विमानतळाला भुंतर विमानतळ (manali airport) देखील म्हणतात, हे भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू आणि मनाली शहरांना सेवा देणारे देशांतर्गत विमानतळ आहे. कुल्लू शहरापासून ११ किमी आणि मनालीपासून ५२ किमी अंतरावर भुंतर येथे हे विमानतळ आहे.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत )

इथे सिंगल रनवे असल्यामुळे हा विमानतळ वैमानिकांसाठी एक आव्हानात्मक विमानतळ (manali airport) मानला जातो. हे विमानतळ बियास नदीच्या काठावर आहे. १९९५ मध्ये अचानक आलेल्या पुरामुळे रनवेला धोका निर्माण झाला होता. भुंतर येथील नवीन एअर टर्मिनलचे २००८ मध्ये उद्घाटन करण्यात आले आणि विमानतळावरील एप्रन एकावेळी दोन विमाने पार्क करण्यासाठी मोठे करण्यात आले. हिमालयन बुल्सने डेक्कन चार्टर्सच्या सहकार्याने २ एप्रिल २०१४ पासून दिवसातून तीन वेळा कुल्लू-चंदीगड-कुल्लू फ्लाइट सुरू केली आहे.

अलायन्स एअर अमृतसर, डेहराडून, दिल्ली आणि जयपूर येथे आणि येथून फ्लाइट सेव अपदान करते. या विमानतळावर यात एकच डांबरी रनवे आहे, त्याची लांबी १,१२५ मीटर (३,६९० फूट) एवढी आहे. विशेष म्हणजे हे विमानतळ समुद्रसपाटीपासून १,०८९ मीटर (३,५७३ फूट) उंचावर आहे. त्यामुळे इथे जोखीम असते. म्हणून विशेष काळजी देखील घ्यावी लागते.

(हेही वाचा – ganesh idol : यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीची कोणती मूर्ती आणाल?)

मनाली विमानतळ (manali airport) कुल्लू शहरापासून अंदाजे ११ किमी आणि मनालीपासून ५२ किमी अंतरावर भुंतर येथे आहे. या विमानतळावर कन्व्हेयर बेल्ट, फायर डिटेक्शन आणि स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा, शौचालये, आधुनिक तिकीट काऊंटर आणि चेक-इन काऊंटर यासह अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

भविष्यात हिमाचल प्रदेश सरकार मनाली विमानतळावर आणखी नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. ग्राहकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्यात आणि संरक्षण मिळावे म्हणून अपग्रेडेशन करण्याची योजना आखली आहे. २४८ कोटी १ लाख रुपये खर्चून रनवे ५५० मीटरने वाढवण्यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.