- ऋजुता लुकतुके
श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाने तिसरा टी-२० सामना जिंकत मालिकाही ३-० ने जिंकली. खरंतर या सामन्यातही श्रीलंकन संघाला शेवटच्या ३० चेंडूंत ३० धावांचीच गरज होती आणि हातात ९ गडी होते. पण, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवने शेवटच्या दोन षटकांत ४ गडी बाद केले. सूर्यकुमारने तर सामना थेट सुपर ओव्हरपर्यंत नेला. हातातून निसटलेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर लंकन फलंदाजांवर शेवटचा आघात करण्याचं काम वॉशिंग्टन सुंदरने केलं. (Ind vs SL, 3rd T20)
आधी फलंदाजीतही त्याने २५ धावा करत आपली कमाल दाखवून दिली होती. त्यानंतर नियमित ४ षटकांत त्याने २३ धावा देत २ बळी घेतले होते. या प्रभावी गोलंदाजीमुळेच सुपर ओव्हरसाठी सूर्यकुमारने त्याचीच निवड केली. वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार आणि संघाला अजिबात निराश केलं नाही. आधी ही सुपर ओव्हर पाहूया. (Ind vs SL, 3rd T20)
Washi as usual ati-Sundar 🙌#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia #WashingtonSundar | @Sundarwashi5 pic.twitter.com/XO2iQpIrLk
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024
(हेही वाचा – Ind vs SL, 3rd T20 : सूर्यकुमारचं आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिलंच षटक भारताला सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेलं)
भारत असा जिंकला सामना
वॉशिंग्टनचा पहिला चेंडू वाईड पडला. दुसरा चेंडू त्याने काहीसा धिमा आणि आखूड टप्प्याचा टाकला. तो पाहून फलंदाज कुशल परेरा चेंडू पूल करायला गेला. पण, डीप बॅकवर्ड स्केअर लेगला असलेल्या रवी बिश्नोईने हा झेल सीमारेषेवर व्यवस्थित घेतला. पुढचाच चेंडू निसांकाने स्लॉग स्विप केला आणि हा झेलही रिंकू सिंगने अलगद पकडला. सुपर ओव्हरमध्ये तुम्ही दोनच गडी खेळवू शकता. त्यामुळे लंकन संघ २ धावांमध्येच बाद झाला. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करत हा सामना भारताला जिंकून दिला. (Ind vs SL, 3rd T20)
२५ धावा आणि एकूण ४ बळी मिळवत वॉशिंग्टन सुंदर सामनावीर ठरला. तर सूर्यकुमार यादवला मालिकावीर किताब मिळाला. या सामन्यात सूर्यकुमारने आपल्या कप्तानीचीही छाप पाडली. ‘मला नेता व्हायचं नाही तर आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व करायचंय आणि संघाला पुढे घेऊन जायचंय,’ असं सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला. (Ind vs SL, 3rd T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community