वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) वर UPSC ने मोठी कारवाई केली. आता तिची आयएएस पदवी रद्द करण्यात आली आहे. UPSC ने पूजा खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास किंवा निवड करण्यास मनाई केली आहे. याशिवाय, तिची CSE-2022 साठीची उमेदवारीही आयोगाने रद्द केली आहे. पूजा खेडकरने CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
(हेही वाचा मालवणीत Hindu युवतीला राहते घर सोडून जाण्यासाठी मुसलमानांकडून छळ)
पूजा खेडकरवर फसवणुकीचा आरोप
विशेष म्हणजे पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. पूजा खेडकरच्या अंतरिम जामिनावर बुधवारी, ३१ जुलै रोजी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. न्यायालय 1 ऑगस्ट रोजी निकाल देणार आहे. नुकतेच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकर (Pooja Khedkar) विरोधात गुन्हा दाखल केला होता. यूपीएसपीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली. पूजा खेडकर हिच्यावर नाव, छायाचित्र, ईमेल, पत्ता अशा कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.
Join Our WhatsApp Community