पूर्व सूचना मिळूनही सरकारने पावले उचलली नाहीत; केरळ मधील दुर्घटनेवर Amit Shah यांनी व्यक्त केली खंत

161
पूर्व सूचना मिळूनही सरकारने पावले उचलली नाहीत; केरळ मधील दुर्घटनेवर Amit Shah यांनी व्यक्त केली खंत

केरळ सरकारला पूर्वकल्पना आणि मदत देऊनही राज्य सरकारने वेळीच पावले न उचलल्यामुळे १५८ जणांचा बळी गेल्याची खंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केली. यासंदर्भात बुधवारी (३१ जुलै) गृहमंत्र्यांनी राज्यसभेत भाष्य केले.

केरळच्या भूस्खलनातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून गृहमंत्री (Amit Shah) म्हणाले की, केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजी पाऊस आणि भूस्खलनाची पूर्व कल्पना देण्यात आली होती. तसेच केंद्र सरकारने २३ तारखेला एनडीआरएफची ९ पथके केरळला पाठवली होती. परंतु, राज्य सरकारने नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी काहीच केली नाही. आगामी २६ जुलैला २० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे आम्ही आधीच सांगितले होते. तरी देखील केरळ सरकारने लोकांचे स्थलांतर केले नाही. स्थलांतर केले असते, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता असे शाह यांनी सांगितले.

(हेही वाचा – लैंगिक अत्याचार पीडितांची वैद्यकीय तपासणी केवळ महिला डॉक्टरांनीच करावी; Karnataka High Court चा निर्णय)

‘कोणतेही राज्य एसडीआरएफमध्ये १० टक्के रक्कम स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करू शकते. आपत्तीच्या नावाखाली १० टक्के खर्च केला तर कोणी विचारत नाही, पण ९० टक्के रक्कम मार्गदर्शक तत्त्वांनुसार खर्च करावी लागते. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला २३ जुलै रोजीच संभाव्य भूस्खलनाबाबत इशारा देण्यात आला होता, पण सरकारने काहीच केले नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. केरळच्या जनतेच्या आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे. केंद्र सरकार केरळच्या लोकांसोबत आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शाह (Amit Shah) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.