विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चक्रव्यूह विधानावरून लोकसभेत गदारोळ झाला. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील खासदार अभिनेत्री कंगना रणौत यांनी म्हटले आहे की, राहुल संसदेत ज्या प्रकारच्या फालतू गोष्टी बोलतात ते पाहता त्यांची ड्रग्ज टेस्ट करून घ्यावी. एकतर ते दारू किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली संसदेत पोहोचतात.
संसद अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थसंकल्पाची तुलना महाभारताच्या चक्रव्यूहाशी केल्यावर खासदार कंगना रणौत यांचे हे वक्तव्य आले आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून 6 जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, जे कमळाच्या फुलाच्या आकाराचे आहे. त्यात भीती आणि हिंसा आहे. 21व्या शतकात एक नवे ‘चक्रव्यूह’ निर्माण झाले आहे, तेही कमळाच्या फुलाच्या रूपात. पंतप्रधान हे चिन्ह छातीवर धारण करतात. जे अभिमन्यूचे केले गेले ते भारतासोबत केले जात आहे. आज चक्रव्यूहाच्या मध्यभागी 6 लोक आहेत. हे 6 लोक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी.
(हेही वाचा लैंगिक अत्याचार पीडितांची वैद्यकीय तपासणी केवळ महिला डॉक्टरांनीच करावी; Karnataka High Court चा निर्णय)
काय म्हणाल्या कंगना रणौत?
बघा, देशात लोकशाही आहे. इथे पंतप्रधान लोकशाही पद्धतीने निवडला जातो. ज्यांनी हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) निवडले आहेत, ते लोकशाहीचा आदर करत नाहीत का? पंतप्रधानांची निवड वय, वर्ग किंवा जातीच्या आधारावर होते का? उद्या ते (राहुल गांधी) म्हणतील पंतप्रधान त्वचेचा रंग बघून निवडतात. त्यांना (राहुल गांधी) संविधान आणि लोकशाहीबद्दल आदर नाही. सोमवारीही त्यांनी संसदेत कॉमेडी शो केला. त्यांना संसदेची प्रतिष्ठा नाही. आम्ही भगवान शंकरांची वरात आहोत आणि हे चक्रव्यूह आहे, असे ते सांगत होते. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मला वाटते की तो कोणते ड्रग्ज घेतात का? याची चाचणी केली पाहिजे. ज्या अवस्थेत ते संसदेत पोहोचतात, जसे बोलतात, ते पाहून माझ्यासारख्या नवख्या खासदाराला धक्काच बसला. ते (राहुल) म्हणतात की, ही स्पर्धा शिवजींची वरात आणि चक्रव्यूह यांच्यात आहे. अशा गोष्टी ऐकून तुम्हाला वाटत नाही का की त्यांची ड्रग्ज टेस्ट करावी? कोणताही व्यक्ती शुद्धीत अशा गोष्टी बोलू शकत नाही. मला वाटते एक चाचणी करावी. एकतर ते दारू किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली संसदेत पोहोचत असावे. ही चांगली गोष्ट नाही, असे कंगना रणौत म्हणाले. (Rahul Gandhi)
Join Our WhatsApp Community