Badlapur रेल्वे स्थानकात लोकल सेवा ठप्प; प्रवासी खोळंबले

412

बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकात बुधवार, ३१ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबईहून येणाऱ्या मालगाडीला चुकीचा सिग्नल देण्यात आल्याने या ठिकाणी मालगाडी रुळावरच थांबली. त्यामुळे या ठिकाणी मुंबईहून येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी मुंबईहून बदलापूरला कामावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या ठिकाणी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

(हेही वाचा केरळात चर्च संचालित महाविद्यालयात नमाजासाठी स्वतंत्र जागा देण्याची Muslim विद्यार्थ्यांची मागणी)

तब्बल दोन तास या ठिकाणी लोकल सेवा खोळंबली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी रूळही तुटला आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी बदलापूरचे (Badlapur) अवस्था झाली आहे. यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला आहे. लोकल सेवा कधी पूर्ववत होईल याविषयी रेल्वे प्रशासन नक्की काही सांगायला तयार नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संदिग्धतेचे वातावरण आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.