डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत Shirdi MIDC ची निवड

रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटींची मान्यता

251
डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत Shirdi MIDC ची निवड

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची (Shirdi MIDC) निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (३१ जुलै) घेतला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात बुधवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती.

(हेही वाचा – लेफ्टनंट जनरल Sadhana Saxena Nair यांच्याकडे महासंचालक पदाची जबाबदारी, १ ऑगस्टला स्वीकारणार पदभार)

या बैठकीला महसूल तथा पालकमंत्री अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. शिर्डी एमआयडीसी (Shirdi MIDC) परिसर हा ५०२ एकर असून यातील २०० एकर जागा सवलतीच्या दरात देण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच इतर सवलतीच्या दरांसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

सदरचा निर्णय हा शिर्डी, अहमदनगर, नाशिक तसेच आसपासच्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असून यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी क्षेत्र हे देवस्थान म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून उदयास येईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.