सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती गणेशोत्सवात आपण नेहमीच म्हणतो. त्याचबरोबर इतर आरती देखील म्हणतो. गणपती घरी येतो तेव्हा घरात सुखाचं आणि आनंदाचं वातावारण असतं. सगळं घर कामाला लागतं. जणू गणपती म्हणजे घरातलं बाळ असावं! (ganesh ji ki aarti lyrics)
सार्वजनिक मंडळांमध्येही उत्साहाचं वातावरण असतं. सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने गणपतीची सेवा करण्यात मग्न असतात. अनेक कार्यक्रम सादर केले जातात, समाजोपयोगी सेवा कार्ये केली जातात. गणपती बाप्पाकडे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते. आरती म्हणायला तर प्रत्येक जण पुढाकार घेतो. आज आम्ही तुम्हाला गणपतीच्या विविध आरतींची lyrics देणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला आरती म्हणताना अडचण होणार नाही. (ganesh ji ki aarti lyrics)
(हेही वाचा – RSS देशाची सेवा करणारी संघटना; सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना सुनावले)
१. गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥
सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
२. सुखकर्ता दुःखहर्ता
सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
३. जय देव जय देव जय मंगलमूर्ती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥
४. तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता
तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥
मंगलमूर्ति तूं गणनायक ।
वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥
तुझिया द्वारीं आज पातलों ।
नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं० ॥१॥
तूं सकलांचा भाग्यविधाता ।
तूं विद्येचा स्वामी दाता ॥
ज्ञानदीप उजळून आमुचा ।
निमवीं नैराश्याला ॥ संकटीं० ॥२॥
तूं माता, तुं पिता जगं या ।
ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥
पामर मी स्वर उणें भासती ।
तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥
(हेही वाचा – mohali punjab : पंजाबच्या मोहाली येथील; धार्मिक आणि पर्यटन स्थळे)
५. उठ उठ रे उठ गणराया
उठ उठ रे उठ गणराया तुज आवडता, मोदक घे खाया॥ध्रु०॥
पुर्वेस तिष्ठली सूर्याची किरणे दव ओली झाली दुर्वांची कुरणे
तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया
उठ उठ रे उठ गणराया॥१॥
बघ आकाशी चंद्र गेला विलयाला तुझ ओवाळीत ये रवी उदयाला
उठ उठ रे उठ जगाचे तम साराया
उठ उठ रे उठ गणराया॥२॥
तुज संगे खेळाया जमले बघ रे गण भावे आनंदे उत्सवती
तुझाच रे सण ह्या भक्तांची दु:खे ने विलयाला
उठ उठ रे उठ गणराया॥३॥
६. जय श्रीगणेशा गणपति देवा
जय श्रीगणेशा गणपति देवा, आरती मी करितो ।
मोरया आरती मी करितो ।
भक्तां संकटी पावुनी सकला प्रसन्न तू होतो ॥ धृ. ॥
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी, पार्थिव तुझ करिती ।
मोरया पार्थिव तुझ करिती ॥
भक्तां पावुनि अंती तयाला मोक्षाला नेसी ॥ १ ॥
नानापरिची द्रव्ये पुष्पें, तुजला अर्पिती ।
मोरया तुजला अर्पिती ।
मोदक आणिक रक्तफुलांवरी किती तुझी प्रिती ॥ २ ॥
भक्त रक्षणासाठी देवा, अष्टस्थानीं प्रकटशी ।
मोरया अष्टस्थानीं प्रकटशी ॥
तू मायेची फुंकर घालुनी, तयांस उद्धरशी ॥ ३ ॥
स्थावर क्षेत्री पंचदेवता, तुजला प्रार्थीती ।
मोरया तुजला प्रार्थीती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, मोरेश्वर होसी ॥ ४ ॥
थेऊर क्षेत्रीं भक्त तुझे बहु, चिंता ते करिती ।
मोरया चिंता ते करिती ।
चिंता हरिशी म्हणुनी गणेशा चिंतामणि म्हणती ॥ ५ ॥
पल्लव क्षेत्री भक्त चिमुकलें, तुजला पूजिती ।
मोरया तुजला पूजिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, बल्लाळेश्वर होसी ॥ ६ ॥
दत्तात्रेय सुत विनवितसे चरणी ।
मोरया विनवितसे चरणी ॥
सर्व जनाते संकटी रक्षी, हीच असे विनवणी ॥ ७ ॥ (ganesh ji ki aarti lyrics)
७. मंगलदायक सिद्धीविनायक
मंगलदायक सिद्धीविनायक आरती ही तुजला ।
करितों भावे दुर्वापुष्पे वाहुनी चरणाला ॥ धृ ॥
कार्यारंभी पूजन तुझे सकल जन करिती ।
इच्छा पूरवूनी सकलां देसी सुखशांती सुमती ॥ १ ।।
सिंदुरखल मातुनी जेव्हा उपदाव केला ।
भक्त रक्षणासाठी धावुनी सिंदुरखल वधिला ॥ २ ॥
ऐसा अगाध महिमा तुझा परम अपार ।
वर्णावया शेषही थकला थकले सुरवर ॥ ३ ॥
दीनदास मी तुझ्या प्रसादा ।
तिष्टतसे दारी ।
प्रसन्न होऊनी निजदासाला संसारी तारी ॥ ४ ॥
८. जय जय जी शिवकुमरा प्रणतवत्सला
जय जय जी शिवकुमरा प्रणतवत्सला ।
ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥ धृ ॥
लंबोदर वक्रतुंड शोभतें किती ।
मोरमुकुट वैजयंती कंठी झळकती ॥
कनकवलय तोडर ते बहुत विलसती ।
होतो बहु तोष मनीं पाहुनीं तुला ॥ १ ॥
त्वत्स्वरुप त्वद्गुण हे स्वांति आणुनी ।
ओंवाळिन पंचारती लुब्ध होऊनि ॥
विनवितसे दत्तात्रय लीन भाषणी ।
भवतरणा अध वारुनि उद्धरी मला ॥ २ ॥
९. गणराया हे माझ्या ह्रदयाला
गणराया हे माझ्या ह्रदयाला ॥
ओवाळु आरती तव पायां ॥ धृ ॥
दे मति निर्मळ तव गुण गायां ॥
अद्वय मज सुख द्याया ॥ १ ॥
मज कल्पित विधिवदर्चनवंदन ॥
मानूनि घे आजि सदया ॥ २ ॥
महामायात्मज विघ्न हराया ॥
शांता पदरजी मन दे रहाया ॥ ३ ॥
१०. गणराया आरती ही तुजला
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति घुंगूर ।
गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी ।
पुजिती जन तुजला ॥ २ ॥
गंध पुष्प धुप दीप समर्पुनी ।
अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥
भक्त हरी हा आठवितो रुप ।
गातो तव लीला ॥ ४ ॥ (ganesh ji ki aarti lyrics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community