Crime : २१ कोटींचे सोने चोरून शेअर्स खरेदी करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या ३ कर्मचाऱ्यांना अटक

188
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक

एका खाजगी फायनान्स कंपनीच्या लॉकरमध्ये असलेले २१ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विकून त्या पैशातून शेअर्स खरेदी करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या एरीया मॅनेजरसह ३ जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने अटक केली आहे. या तिघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

शिवकुमार आयर (३०), शिवाजी पाटील (२९) आणि सचिन साळुंखे (४१) यांना अटक केली. रोव्हर फायनान्सच्या डोंबिवली शाखेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या आयर आणि एरिया हेड पाटील यांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बँकेच्या लॉकरमधून विविध ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची २६० पाकिटे काढून घेतली. त्यानंतर त्यांनी या सोन्याचा वापर खासगी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी केला आणि त्यातून मिळालेले पैसे साळुंखे या सराफा व्यापाऱ्यामार्फत शेअर बाजारात गुंतवले, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली. (Crime)

(हेही वाचा – डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत Shirdi MIDC ची निवड)

लेखापरीक्षणात सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे सोने गहाळ झाल्याचे समोर आल्यानंतर ही योजना उघडकीस आली. अंतर्गत चौकशीत आयर व पाटील यांच्याकडे लॉकरमध्ये प्रवेश व चाव्या असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला थेट उत्तरे देणे टाळले, मात्र नंतर वस्तुस्थिती सांगितली, असे या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी आकाश पाचलोद यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०८, ४०९, ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासकर्त्यांनी आयरच्या बँक स्टेटमेंटची पडताळणी केली, व्यवहार आणि शेअर बाजारातील त्याच्या गुंतवणुकीचा शोध घेतला. या तिन्ही संशयितांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.