MP Tiger: दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेने धडक दिलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू 

174
MP Tiger: दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेने धडक दिलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू 
MP Tiger: दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेने धडक दिलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू 

मध्य प्रदेशमधील सिहोर जिल्ह्यात (Sehore District) दोन आठवड्यांपूर्वी ट्रेनच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाच्या दोन पिल्लांचा भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानात (Vanvihar National Park, Bhopal) उपचारादरम्यान मृत्यू झाला. वनविहार नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी झाल्यानंतर एका शावकाने खाणे-पिणे बंद केले होते, त्यामुळे मंगळवारी त्याचा मृत्यू (Tiger Death) झाला, तर दुसऱ्या शावकाचा बुधवारी मृत्यू झाला. (MP Tiger)

(हेही वाचा – ED Raid: साखर कारखान्यात गैरव्यवहार; ईडीची पुण्यासह मुंबईत छापेमारी)

वाघाच्या पिल्लांना पश्चिम मध्य रेल्वेच्या विशेष सिंगल कोच ट्रेनने १७ जुलै रोजी भोपाळला आणण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, १४ आणि १५ जुलैच्या मध्यरात्री भोपाळपासून ७० किमी अंतरावर असलेल्या वनक्षेत्रात तीन शावक ट्रेनच्या धडकेने जखमी अवस्थेत आढळले. एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जखमी शावकांना वनविहार राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. (MP Tiger)

वाघाच्या दोन पिल्लांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

अधिकाऱ्याने सांगितले की, १७ जुलै रोजी पशुवैद्य आणि इतर वैद्यकीय पथकातील सदस्यांनी वाघाच्या दोन पिल्लांची तपशीलवार आरोग्य तपासणी आणि एक्स-रे केले. अधिकाऱ्याने सांगितले की, शवविच्छेदनानंतर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंगळवार आणि बुधवारी मृत शावकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (MP Tiger)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.