Delhi Rain : दिल्लीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, नवीन संसदेत पाणी साचलं

150
Delhi Rain : दिल्लीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, नवीन संसदेत पाणी साचलं
Delhi Rain : दिल्लीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, नवीन संसदेत पाणी साचलं

दिल्लीमध्ये बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे (Delhi Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवीन बांधण्यात आलेल्या संसदेत देखील पाणी साचलं आहे. दिल्ली आणि नोएडाचे रस्त्यावर पाणी साचले आहे. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी कार्यालयातून निघालेल्या कर्मचाऱ्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. अवघ्या दोन तासांच्या पावसात दिल्ली जलमय झाली आहे. हवामान खात्याने मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता.

(हेही वाचा –MP Tiger: दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेने धडक दिलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू )

दिल्लीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर आणि अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोक अडकले आहेत. गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचवेळी, पावसामुळे दिल्लीच्या AQI मध्ये मोठी सुधारणा दिसून आली आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक लोक अडचणीत आले असून, सखल भागात असलेल्या वस्त्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. (Delhi Rain)

(हेही वाचा –अलिगढमध्ये 94 बेकायदेशीर Madrasa होणार बंद; 2000 मुले आता सरकारी शाळांमध्ये शिकणार)

राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत संततधार पावसामुळे ओल्ड राजिंदर नगरमध्ये पाणी साचले होते. 27 जुलै रोजी येथील आयएएस कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. राष्ट्रीय राजधानीतील मानसिंग रोड, एम्स, नोएडाच्या सेक्टर 59, सेक्टर-62, ममुरा, गिझोर आदींव्यतिरिक्त अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने आयटीओजवळ वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेगही मंदावल्याने दृश्यमानता कमी झाली. (Delhi Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.