Paris Olympic 2024 : स्वप्निल कुसळेचा ५० मीटर थ्री पोझिशनचा अंतिम सामना, भारतीय संघाचं गुरुवारचं वेळापत्रक 

Paris Olympic 2024 : भारतासाठी गुरुवारी एक पदकाचा सामना आहे 

140
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिकच्या (Paris Olympic 2024) सहाव्या दिवशी गुरुवारी भारताचं लक्ष पुन्हा एकदा नेमबाजांवर असेल. कारण, महाराष्ट्राता स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी खेळणार आहे. तर हॉकी संघही साखळीतील आपला पुढचा सामना बलाढ्या बेल्जिअमशी खेळणार आहे. त्याशिवाय मुष्टियुद्ध आणि तिरंदाजीतील महत्त्वाचे सामनेही भारतीय खेळाडूंना खेळायचे आहेत.

(हेही वाचा- Crime : २१ कोटींचे सोने चोरून शेअर्स खरेदी करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या ३ कर्मचाऱ्यांना अटक)

इतकंच नाही तर १ ऑगस्टपासून लांब पल्ल्याच्या ॲथलेटिक्स स्पर्धांनाही सुरुवात होत आहे. महत्त्वाचं म्हणजे सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारताची दुहेरी जोडी आपला उपउपान्त्य फेरीचा सामना खेळणार आहे. भारतीय संघाचं १ ऑगस्ट, गुरुवारचं वेळापत्रक पाहूया, (Paris Olympic 2024)

ॲथलेटिक्स 

११.०० – परमजीत सिंग, आकाश सिंग व विकास सिंग ही त्रयी २० किमी चालण्याची स्पर्धा खेळणार आहे.

१२.५० – महिलांची २० मीटर चालण्याची शर्यत प्रियंका गोस्वामी

(हेही वाचा- अलिगढमध्ये 94 बेकायदेशीर Madrasa होणार बंद; 2000 मुले आता सरकारी शाळांमध्ये शिकणार)

बॅडमिंटन 

१२ – लक्ष्य सेन वि. एच एस प्रणॉय (पुरुषांचा अंतिम १६ मधील सामना)

४.३० – संध्याकाळी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांचा दुहेरीतील उपउपान्त्य फेरीचा सामना

१०.०० – रात्री पी व्ही सिंधूचा महिला एकेरीतील उपउपान्त्य फेरीचा सामना

गोल्फ 

१२.३० – गगनजीत सिंग भुल्लर व शुभांकर शर्मा यांची वैयक्तिक स्टोक प्ले पहिली फेरी

(हेही वाचा- MP Tiger: दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेने धडक दिलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू )

नेमबाजी 

१.०० – स्वप्निल कुसळेची ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारातील अंतिम फेरी

३.३० – सिफ्त कौर व अंजुम मुदगल यांची महिला थ्री पोझिशन पात्रता फेरी

हॉकी 

१.०० – भारत वि. बेल्जिअम ब गटातील साखळी सामना

टेबलटेनिस 

१.३० – श्रीजा आकुलाची उपउपान्त्य फेरीचा सामना

(हेही वाचा- Kedarnath Cloudburst: केदारनाथमध्ये ढगफुटी, २०० भाविक अडकले)

मुष्टियुद्ध 

२.३० – निखत झरिन वि. यु वू (महिलांची ५० किलो वजनी गटातील अंतिम १६ जणांची फेरी)

तिरंदाजी 

२.३० – प्रवीण जाधव वि. काओ वेनचाऊ (पुरुषांची वैयक्तिक रिकर्व्ह अंतिम ३२ जणांची फेरी)

३.१० – प्रवीण जाधवची अंतिम १६ जणांची फेरी (पात्र ठरल्यास)

(हेही वाचा- BMC : डॉ शिंदे यांच्याकडील पदभार तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपवला विभागून, आरोग्य विभाग डॉ. जोशी यांच्याऐवजी बांगर यांच्याकडे)

सेलिंग 

३.४५ – विष्णू सर्वाननची डिंगी रेस १ व रेस २

७.०५ – संध्याकाळी महिलांची डिंगी रेस १ व रेस २ नेत्रा कुमानन

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.