-
ऋजुता लुकतुके
आपल्या क्रिकेट कारकीर्दीत जिगरबाज फलंदाज अशी ओळख असलेले माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा कर्करोगाशी सुरू असलेला दीर्घकाळचा लढा अखेर बुधवारी संपला आणि ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतासाठी ते ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले होते. तर २००० साली चॅम्पियन्स करंडकात उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षक होते. (Anshuman Gaikwad No More)
(हेही वाचा- LPG Cylinder Rates Hiked: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागले!)
भारतीय क्रिकेटमध्ये अंशुमन यांना चार्ली या टोपणनावाने ओळखलं जात असे. त्यांच्या काळात एकनाथ सोलकर (Eknath Solkar), मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) आणि अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad No More) हे त्यांच्या जिगरबाज फलंदाजीसाठी ओळखले जायचे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar), विश्वनाथन (Viswanathan) आणि कपिल देवच्या (Kapil Dev) काळात भारतीय संघात त्यांनी स्थान मिळवलं आणि टिकवलं. आपली विकेट न फेकणं आणि कठीण परिस्थितीतही फलंदाजी करणं, दुखापतींची पर्वा न करणं यासाठी अंशुमन ओळखले जात. (Anshuman Gaikwad No More)
त्यांच्या मृत्यूनंतर सुनील गावसकर यांनीही त्यांच्या याच गुणांना उजाळा दिला. ‘अंशुमनच्या काळात मी क्रिकेट खेळलो आणि त्याला खेळताना पाहिलं याचा मला अभिमान आहे. नरी कॉन्ट्रॅक्टर फासळीचं हाड मोडलं असताना लॉर्ड्सवर खेळला आणि नाबाद ८१ धावा केल्या होत्या. तशीच जिगर कायम अंशुमनने दाखवली आहे. तो खेळपट्चीवर पहाडासारखा उभा असायचा. आताही कर्करोगाशी त्याने जिद्दीने आणि खूप काळ लढा दिला. त्याने हार मानली नाही. कधीही भेटला तर उत्साही असायचा,’ असं सुनील गावसकर यांनी अंशुमन यांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं. (Anshuman Gaikwad No More)
Shri Anshuman Gaekwad Ji will be remembered for his contribution to cricket. He was a gifted player and an outstanding coach. Pained by his demise. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2024
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अंशुमन गायकवाड यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधानांच्या गुजरातमधूनच अंशुमन येतात. ‘क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी अंशुमनजी कायम लक्षात राहतील. त्यांचा खेळ अप्रतिम होता. आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त करतो. कुटुबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती!’ असा ट्विटर संदेश पंतप्रधान मोदींनी लिहिला आहे. (Anshuman Gaikwad No More)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community