-
ऋजुता लुकतुके
मुष्टियुद्धात पुन्हा एकदा लवलिना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) आपली चपळाई आणि कसब दाखवून दिलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही आपली आगेकूच कायम ठेवत अंतिम ८ जणांची फेरी गाठली आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक पदकापासून ती फक्त एक विजय दूर आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- LPG Cylinder Rates Hiked: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागले!)
टोकयो ऑलिम्पिकमध्ये लवलिना ६९ किलो वजनी गटात खेळली होती. तिथे तिने कांस्य पदकही जिंकलं. त्यानंतर आता लवलिना ७५ किलो वजनी गटात खेळते. तेव्हापासून तिने जागतिक अजिंक्यपदही जिंकलं आहे. आता ऑलिम्पिकमध्येही तिने आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली आहे. (Paris Olympic 2024)
अंतिम १६ जणांच्या सामन्यात लवलिनाचा मुकाबला नॉर्वेच्या सनिवा हॉफस्टाडशी होता. पण, लवलिनाने घंटा वाजल्यापासूनच आक्रमण सुरू केलं. प्रतिस्पर्ध्याला फारशी संधीच दिली नाही. उंचीचाही तिने चांगला फायदा उचलला. (Paris Olympic 2024)
A 𝑳𝒐𝒗𝒍𝒊 PERFORMANCE FROM THE CHAMP!! 🥊
She punches her way into the Quarter-Finals 😤 💪
Stream the action on #JioCinema for FREE. Also, watch it LIVE on #Sports18!#Cheer4Bharat #OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #Paris2024 #Boxing pic.twitter.com/j5ogV5iWmQ
— JioCinema (@JioCinema) July 31, 2024
सनिवाला सतत रिंगच्या कोपऱ्यात गाठून तिच्यावर हल्ला चढवला. ही चाल यशस्वी ठरली. पाचही रेफरींनी निर्विवादपणे लवलिनच्या पारड्यात निकालाचं दान टाकलं. ५-० असा विजय तिने मिळवला. पुरुषांच्या वेल्टरवेट प्रकारात निशांत देवनेही (Nishant Dev) उपांत्य फेरी गाठली आहे. त्याची मात्र चांगलीच दमछाक झाली. जोस ग्रॅब्रिएल रॉड्रिगेझ टोनोरिओला त्याने ३-२ असं हरवलं. दोघांकडून तुल्यबळ खेळ झाला. दोघंही आक्रमक होते. पण, मोक्याच्या क्षणांवर निशांतचा ताबा होता. त्याने प्रतिस्पर्ध्याला कोंडित पकडण्याची एकही संधी सोडली नाही. खासकरून शेवटच्या फेरीत त्याने जवळून हल्ला करत प्रतिस्पर्ध्याला जेरीला आणलं. तिथेच त्याचा विजय स्पष्ट झालं. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Anshuman Gaikwad No More : कर्करोगाशी झुंजत असलेले माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन )
आता लवलिना (Lovlina Borgohain) आणि निशांत (Nishant Dev) ४ ऑगस्टला उपांत्यपूर्व आणि पात्र ठरल्यास उपांत्य लढत खेळणार आहेत. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community