-
ऋजुता लुकतुके
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालची ऑलिम्पिक मोहीम बुधवारी संपुष्टात आली. आधीच नोवाक जोकोविचकडून एकेरीत त्याचा पराभव झाला होता. आता दुहेरीत नदाल आणि अल्काराझ जोडीचा अमेरिकन जोडीकडून पराभव झाला. ऑस्टिन क्रायजॅक (Austin Krajicek) आणि राजीव राम (Rajeev Ram) या जोडीने त्यांचा दोन सरळ सेटमध्ये ६-२ आणि ६-४ असा पराभव केला. अमेरिकन जोडी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. या पराभवानंतर राफेल नदालच्या (Rafael Nadal) ऑलिम्पिक कारकीर्दीला पूर्णविराम लागला आहे. (Nadal Olympic Campaign Ends)
(हेही वाचा- Crime News : सातारा हादरलं! प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलले)
आताही पायाच्या दुखापतीने त्याला सतावलं होतं. पहिला सेट गमावल्यावर त्याने अडिच मिनिटांचा दुखापतींचा ब्रेकही घेतला. नदाल आणि अल्काराझचा हा सामना फिलीप कॉरटे मैदानावर आयोजित करण्यात आला होता. याच कोर्टवर नदालने आपली १४ फ्रेंच ओपन विजेतेपदं पटकावली होती. (Nadal Olympic Campaign Ends)
दुहेरीतील सामन्यातही नदालला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. खेळण्यात अवघडलेपण असतानाही नदालने पराभव टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पहिला सेट तो फारशी कमाल दाखवू शकला नाही. दोनदा त्यांची सर्व्हिस भेदली गेल्यावर हा सेट त्यांनी सुरुवातीलाच ६-२ ने गमावला. त्यानंतर पायावर थोडेफार उपचार घेऊन नदाल मैदानात पुन्हा उतरला. आणि यावेळी अल्काराझच्या मदतीने त्याने आणखी एक निकराचा प्रयत्न केला. पण, अमेरिकन जोडी दोघांपेक्षा तंदुरुस्ती आणि चापल्य यांच्याबाबतीत सरस होती. (Nadal Olympic Campaign Ends)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : स्वप्निल कुसळेचा ५० मीटर थ्री पोझिशनचा अंतिम सामना, भारतीय संघाचं गुरुवारचं वेळापत्रक )
नदालने यापूर्वी २००८ मध्ये एकेरीत सुवर्ण जिंकलं आहे. तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने दुहेरीतही सुवर्ण जिंकलं आहे. पण, यावर्षी नदालने पुनरागमनाचा निकराचा प्रयत्न केला तरी त्याला सलग दोन महिने खेळणंही कठीण जातंय. दुहेरीचा सामना गमावल्यावर नदाल आपलं सामान गोळा करत असताना पूर्णवेळ या क्लेकोर्टकडे कौतुकाने पाहत होता. त्या नजरेतूनच त्याच्या भावना समजत होत्या. (Nadal Olympic Campaign Ends)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community