Swapnil Kusale Bronze : ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये सावरकर एअर रायफल क्लबचा प्रशिक्षणार्थी स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक

Swapnil Kusale Bronze : स्वप्निलने कमाल करताना भारताचं नेमबाजीतील तिसरं कांस्य मिळवून दिलं आहे 

147
Swapnil Kusale Bronze : ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक
Swapnil Kusale Bronze : ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक
  • ऋजुता लुकतुके

२८ वर्षीय नेमबाज स्वप्निल कुसाळेनं (Swapnil Kusale Bronze) ५० मीटर थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत कमाल करताना ४५१.४ गुण कमावत तिसरा क्रमांक पटकावला. भारताला या ऑलिम्पिकमधलं नेमबाजीतील तिसरं कांस्य मिळवून दिलं. खरंतर स्वप्निल अंतिम फेरीत पोहोचला असला तरी प्रतिस्पर्धी नमबाजांपेक्षा जागतिक क्रमवारीत नवखा होता. अंतिम ८ पैकी केवळ एक नेमबाज त्याच्यापेक्षा कमी होता. असं असताना त्याने अंतिम फेरीत झोपून, गुडघ्यावर बसून आणि उभं राहूनही चांगली कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक मिळवणारा स्वप्नील कुसाळे स्वातंत्र्यवीर सावरकर एअर रायफल क्लबचा प्रशिक्षणार्थी आहे. त्याच्या विजयानंतर सावरकर एअर रायफल क्लबमध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले.

थ्री पोझिशनमध्ये आधी झोपून, मग गुडघ्यावर बसून आणि मग उभं राहून अशा प्रत्येकी १५ फैरी स्पर्धक झाडतात. मग बाद फेरीच्या प्रत्येकी २ आणि शेवटी एक फैर झाडायची असते. (Swapnil Kusale Bronze)

(हेही वाचा- Missed 31st July Deadline : आयकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची तारीख हुकली तर काय कराल?)

Missed 31st July Deadline 4

पैकी झोपून झाडायच्या १५ फैरींमध्ये स्वप्निल ८ स्पर्धकांमध्ये सहावा होता. त्यानंतर गुडघ्यावर बसून झाडलेल्या १५ फैरीत तो पाचवा आला. त्याने खरी झेप घेतली ती उभं राहून झाडायच्या १० फैरींमध्ये तीन पोझिशन पैकी पहिल्या दोन त्या मानाने सोप्या असतात. पण, उभं राहून झाडायच्या फैरीत रायफलला फारसा आधार मिळत नाही. त्यामुळे ही पोझिशन सगळ्यात कठीण असते. इथंच बाकीचे स्पर्धक काहीसे मागे पडत गेले. पण, स्वप्निल पुढे गेला. इथं सातत्याने १० पेक्षा जास्त गुण मिळवत तो अखेर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. (Swapnil Kusale Bronze)

स्वप्निलने दडपणाखाली सुरेख कामगिरी करत हे पदक भारताला मिळवून दिलं. ५० मीटर थ्री पोझिशन ही नेमबाजीतील मॅरेथॉन मानली जाते. कारण, जवळ जवळ एक तास अंतिम फेरीच चालते. पण, तंत्रावर विश्वास ठेवत स्वप्निलने चांगली कामगिरी बजावली. उभं राहून झालेल्या दोन सीरिजमध्ये स्वप्निलने ५१.१ आणि ५०.४ गुण मिळवले. चीनचा लि ऊ पहिला आला. (Swapnil Kusale Bronze)

Missed 31st July Deadline 5

सामना संपल्यानंतर स्वप्निलने अगदी संयत प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मी फक्त तंत्रावर विश्वास ठेवला. गुणांवर लक्ष न ठेवता तंत्र कसं घोटता येईल याला महत्त्व दिलं. विजयाचा आनंद नक्कीच आहे. पण, आता शांत राहायची सवय झालीय. कदाचित पदक हातात आल्यावर जास्त आनंद वाटेल,’ असं स्वप्निल म्हणाला. स्वप्निलचं हे पहिलं ऑलिम्पिक आहे. (Swapnil Kusale Bronze)

(हेही वाचा- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! CM ladki Bahin योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली)

भारतीय नेमबाजांनी आता ऑलिम्पिकमध्ये तीन पदकं मिळवली आहेत. मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक आणि सरबज्योत सिंगसह मिश्र सांघिक प्रकारातही कांस्य जिंकलं आहे. आता स्वप्निलने तिसऱ्या पदकाची भर घातली आहे. नेमबाजीत भारताच्या अजून तीन स्पर्धा बाकी आहेत. मनू भाकेर तिच्या लाडक्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात शुक्रमवारी खेळणार आहे. (Swapnil Kusale Bronze)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.