Parliament Session : निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी होणार का? संसदेत चर्चा

135
Parliament Session : निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी होणार का? संसदेत चर्चा

आमदार खासदार होण्यासाठी निवडणूक लढवावी लागते. ती निवडणूक लढविण्यासाठी २५ वर्ष वयाची मर्यादा अशी अट आहे. ती २५ वरून २१ वर आणावी यासाठी संसदेत (Parliament Session) चर्चा करण्यात आली. यामुळे खरंच वय मर्यादा कमी करणार काय अशी उत्सुकता तरुण वर्गात निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २१ वर्षे वय मर्यादा करण्याची मागणी खासदार राघव चड्ढा यांनी केली आहे.

लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सध्या वयाची २५ वर्षे पूर्ण असायला हवीत, अशी अट आहे. ही अट कमी करण्याची मागणी राज्यसभेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार (Central Govt) यावर विचार करणार का, याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या १७ व्या लोकसभेतील खासदारांमध्ये ४० टक्क्यांपेकी कमी वय असलेले केवळ १२ टक्के खासदार आहेत. युवा देश आणि ज्येष्ठ राजकारणी, अशी आपली स्थिती आहे. आपल्याला युवा देश आणि युवा राजकारणी असा प्रवास करावा लागेल, असे चड्ढा म्हणाले. (Parliament Session)

(हेही वाचा – लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! CM ladki Bahin योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली)

विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठीचे वय २५ वरून २१ वर्षे करण्याची मागणी चड्ढा यांनी केली आहे. ते म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरूण देश आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांहून कमी वर्याची आहे. तर आपली ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षेहून कमी वयाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २६ टक्के खासदार ४० वर्षांहून कमी वयाचे होते. दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या १७ व्या लोकसभेतील खासदारांमध्ये ४० टक्क्यांपैकी कमी वय असलेले केवळ १२ टक्के खासदार आहेत. (Parliament Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.