Pooja Khedkar ला मोठा झटका; कधीही होऊ शकते अटक

171
Pooja Khedkar ला मोठा झटका; कधीही होऊ शकते अटक
Pooja Khedkar ला मोठा झटका; कधीही होऊ शकते अटक

पूजा खेडकर हिच्यावर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र व ओबीसी आरक्षणाचा चुकीचा लाभ घेऊन IAS झाल्याचा आरोप आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने या आरोपांची गंभीर दखल घेत बुधवारीच तिची ट्रेनी आयएएस म्हणून झालेली निवड रद्दबातल केली. त्यानंतर आता पटियाला कोर्टाने तिला मोठा झटका दिला आहे.

(हेही वाचा – Ind vs SL, ODI Series : विराट, रोहितने चाहत्याला स्वाक्षरी देऊन केलं खुश)

या प्रकरणी यूपीएससीला बोगस प्रमाणपत्रांचा वापर करून कुणी OBC व PWD आरक्षणाचा गैरफायदा घेतला आहे का?, याची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एवढेच नाही, तर दिल्ली पोलिसांनाही केंद्रीय लोकसेवा आयोगातील (यूपीएससी) एखाद्या अधिकाऱ्याने खेडकर हिला या प्रकरणात मदत केली आहे का?, याचा धुंडाळा घेण्याचे आदेश दिलेत. कोर्टाच्या या कठोर भूमिकेमुळे पूजा खेडकर हिला कोणत्याही वेळी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तत्पर्वी, पूजा खेडकर हिने दिल्लीस्थित पटियाला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तिच्या अर्जावर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तिचा अर्ज फेटाळून लावला. आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

कोर्टाने दिल्ली पोलीस अन् यूपीएससीला निर्देश

कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली पोलिसांना UPSC मधील आणखी कुणी पूजा खेडकर यांना या सगळ्या प्रकारात मदत केली आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय कोर्टाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला पूजा खेडकरशिवाय अन्य एखाद्या उमेदवाराने निकषांत बसत नसतानाही क्रिमिलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केला होता का किंवा दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र लावून आरक्षणाचा लाभ मिळवला काय? याचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.