Deep Amavasya : ‘हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी’ आणि ‘फोंडाघाट फार्मसी’ यांच्यातर्फे साजरा झाला दीपोत्सव

150
Deep Amavasya : 'हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी' आणि 'फोंडाघाट फार्मसी' यांच्यातर्फे साजरा झाला दीपोत्सव
Deep Amavasya : 'हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी' आणि 'फोंडाघाट फार्मसी' यांच्यातर्फे साजरा झाला दीपोत्सव

शंभरीत पदार्पण करणारी ‘हरिभाऊ विश्वनाथ यांची वाद्यपेढी’ यांच्यातर्फे आणि ‘फोंडाघाट फार्मसी’ यांच्या सहकार्याने, रविवार, २८ जुलै २०२४ रोजी, प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिरच्या पाचव्या मजल्यावरील “करिष्मा” हॉलमध्ये दीप अमावस्या (Deep Amavasya) आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी झाली.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव मंडळांना येत्या ६ ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगी, मंडप उभारणीसाठी १०० रुपयांचे शुल्क)

दीप अमावस्येची परंपरा जपण्यासाठी ‘तेजोमय स्वरनाद’ कार्यक्रम

आषाढ महिन्यात येणारी अमावस्या ही पूर्वापार, दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. सध्या ही संस्कृतिक परंपरा लोप पावत चाललेली आहे. नवीन पिढीला ही केवळ “गटारी अमावस्या” म्हणून माहीत आहे. हा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानेच ‘हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी’ आणि सत्तर वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेली ‘फोंडाघाट फार्मसी’ यांनी एकत्र येऊन ‘तेजोमय स्वरनाद’ हा कार्यक्रम संपन्न केला.

…असा संपन्न झाला कार्यक्रम

गायिका पद्मजा फेणाणी आणि श्रुती सडोलीकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केवळ “दीपप्रज्वलनच” नव्हे, तर दीप पूजनही झाले. पद्मजा फेणाणी यांनी आपले मनोगत सांगताना आपल्या तेजस्वी आवाजाचा नमुना पेश केला. हजारांच्या वर दिव्यांचे कलेक्शन असलेले “मकरंद करंदीकर” यांनी वेगवेगळ्या दिव्यांची माहिती आणि महत्त्व सांगितले.

नव्या पिढीतील तरुण नृत्यांगनांनी सुंदर नृत्य सादर केल्यानंतर, शास्त्रीय गायक धनंजय म्हसकर, प्राची जोशी आणि श्रुती पोटे यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत वाढवत गेला. हनुमंत रानडे, वैभव कदम, तन्मय मेस्त्री आणि डॉ. हिमांशू गिंडे यांनी त्यांना वाद्यांची साथ दिली. दीपाली केळकर यांच्या दमदार निवेदनाने हा सर्व कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला.

खरेच गटारी साजरी करतात का ?

आपल्याकडे आषाढी अमावास्येच्या नंतर आहारात पालट केला जातो. या दिवसाला ‘गताहारी (जो आहार गेला आहे तो) अमावास्या’ असेही म्हणतात. आपल्या प्रत्येक सणांची नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द दीप अमावास्येला खोडसाळपणे जोडलेला आहे. ‘आपली लायकी गटारात लोळायची आहे’, असे आपल्याला हिणवले गेले आणि दुर्दैव हे आहे की, आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलो आहोत. खरेतर आपण आपल्या महान हिंदु संस्कृतीची जाणीव ठेवायला हवी. आपल्या प्रत्येक सणाला विशेष आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही.

गटार (Gutter) नव्हे, गताहार !

गत म्हणजे मागील, जुने, गेलेले, आता नाही ते. आहार म्हणजे भोजन. गत+आहार = गताहार. जसे शाक + आहारी = शाकाहारी, तसे गत + आहारी = गताहारी. गत + आहारी + अमावास्या = गताहारी अमावास्या. या दिवशी दीपपूजन करतात. (Deep Amavasya)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.