उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची जीभ घसरली. बुधवारी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. तर गुरुवारी १ ऑगस्टला सकाळीच राऊत यांनी ठाकरेंना खुश करण्यासाठी त्यांच्या पुढे जात फडणवीस, भाजपाचे मित्र पक्ष शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असभ्य आणि अश्लाघ्य भाषेत संबोधले तर भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (आरएसएस) टीका केली.
शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाव न घेता फडणवीस यांना उद्देशून म्हणाले की या फालतू टोळ्या, चू**च्या, नामर्दाच्या टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? अशा असभ्य शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ‘ताई माई अक्का’ अभियानाची ‘ताई माई अक्का, आमचा पक्ष छ*’ अशा शब्दात खिल्ली उडवली.
(हेही वाचा – Parliament Session : निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी होणार का? संसदेत चर्चा)
दळभद्री, घाणेरडे, गटारी पद्धतीचे राजकारण
बुधवारी उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना फडणवीस यांना ‘एक तर तू राजकारणात राहशील नाहीतर मी’ असे खुले आव्हान दिले. ही व्यक्तिगत टीका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असून अत्यंत खालच्या पातळीवरील टीका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ही व्यक्तिगत टीका नाही का आणि व्यक्तिगत पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही? असा सवाल पत्रकारांनी केला असता राऊत म्हणाले, अजिबात नाही ही व्यक्तिगत टीका नाही. ज्या पद्धतीने फडणवीस आणि त्यांच्या टोळीने ज्यांचा भाजपा आणि संघ विचारांशी काहीही संबंध नाही, त्यांना सोबत घेत दळभद्री, घाणेरडे, गटारी पद्धतीचे राजकारण सुरू केले. त्याचे परिणाम आज महाराष्ट्र भोगतोय. राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे,” असे राऊत म्हणाले.
.. तर बाळासाहेब ठाकरे नाव घेणार नाही
फडणवीस यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ‘माझ्या नादी लागले तर सोडत नाही,’ असे म्हटल्याचे सांगताच राऊत म्हणाले, “तुमची बोलती लोकसभेला बंद केली. तुमची आता नादी लागण्याची हिम्मत नाही. या फालतू, चू*** च्या, नामर्दाच्या टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? आम्ही तुम्हाला आव्हान देतो, आमच्या नादाला लागा. म्हणजे सीबीआय, ईडी, पोलिस यांची कवचकुंडलं काढा आणि मैदानात उतरा. त्यांना २० फूट जमिनीत गाडले नाही तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही घेणार नाही,” असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस भाजपाचे अध्यक्ष होणार? मंत्री Chandrakant Patil यांची प्रतिक्रिया; म्हणाले…)
संघ असंस्कारी लोकांना पाठीशी घालणारी संघटना
फडणवीस यांचे नाव आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी घेतलं जात आहे आणि आरएसएसने हिरवा कंदील दिला आहे, यावर बोलताना ‘आरएसएस’वर राऊत यांनी टीका केली. “त्यांनी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हावे. संघ परिवार आता असंस्कारी, असुसंस्कृत, अनीतिच्या लोकांना पाठीशी घालणारी संघटना झाली आहे. संविधानाची आणि देशाच्या लोकशाहीच्या चिंधड्या उडविणारे, देशाची संस्कृती खतम करणारे लोक सत्तेत बसले आहेत. संघ काय करतो आहे? असा टोला संघाला लगावला.
माझं तोंड खराब
शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ताई, माई, अक्का’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे, यावरही राऊत यांची जीभ घसरली. “असं आहे की माझं तोंड खराब आहे, असं म्हणतात लोकं. ताई, माई, अक्का, आमचा पक्ष छ** असं म्हटलं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. त्यांना आता प्रतिष्ठा मिळाली आहे,” असे राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community