Police Recruitment : मनोज जरांगेंच्या हट्टीपणामुळे मुसलमानांचे फावले

653
Police Recruitment : मनोज जरांगेंच्या हट्टीपणामुळे मुसलमानांचे फावले
Police Recruitment : मनोज जरांगेंच्या हट्टीपणामुळे मुसलमानांचे फावले

महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. (Police Recruitment) पोलीस भरतीसाठी मराठा समाजाच्या उमेदवारांनी EWS प्रवर्गातून अर्ज केल्याने निर्माण झालेला पेच अद्याप कायम आहे. मराठा उमेदवारांच्या नियुक्ती बाबत धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांनी शासनाला विनंती केली आहे. अशातच शासननिर्णय होईपर्यंत EWS प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळेच मराठा उमेदवारांचे मोठे नुकसान झाल्याने सामाजिक माध्यमांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणी Allahabad High Court ने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली )

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली असल्याने पोलीस भरतीत मराठे पिछाडले आणि त्याचा लाभ मुसलमानांना मिळाला, असेही समाजमाध्यमात मांडले जात आहे. महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया सेलचे माजी संयोजक प्रकाश गाडे यांनी पोलीस भरतीची यादीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अडकल्याने आर्थिक दुर्बल घटकातून मुसलमानांची भरती मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा प्रकाश गाडे यांनी केला आहे.

प्रकाश गाडे यांना आर्थिक दुर्बल घटकातील मराठवाड्याची पोलीस भरतीची यादी ट्वीट केली आहे. यामध्ये शेख, पठाण अशाच नावांच्या उमेदवारांची नावे अधिक प्रमाणात दिसत आहेत. यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मराठा आरक्षण (maratha reservation) समन्वयक आबासाहेब पाटील यांनीही याविषयी संताप व्यक्त केला आहे. ‘शासनात जातीयवादी अधिकाऱ्यांचे जाळे आहे. त्यामुळे कायमस्वरूपी मराठा समाजावर हा अन्याय केला जातो. शासनाच्या अशा धोरणांमुळे मुसलमान समाजाला डबल आरक्षण मिळाले आहे’, असे आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.