काही राजकीय लोकांनी स्टेटमेंट केले आहे की, अजित पवारांनी मधल्या काळात जो निर्णय घेतला. त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. हे बदनामी करण्याचे काम चालले आहे. हे धादांत खोटे आहे. अजित पवार 30 वर्ष राजकारणात आहे. एखाद्याने नाव बदलून जाणे हा गुन्हा आहे. कोण बहुरूपी म्हणते लाज लज्जा शरम वाटली पाहिजे, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांत अजित पवार दिल्लीत वेशांतर करून, नाव बदलून जात होते, अशा चर्चा चालू होत्या. त्यावर नाशिक दौऱ्यावर असतांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा कांस्य पदक विजेता सरबज्योत सिंगचं मायदेशी जल्लोषात स्वागत)
अजित पवार पुढे म्हणाले की, काही जण मला भेटणार होते. मी सांगितले बनकर यांच्याकडे या. त्यात सकाळचा भोंगा वाजतो त्याने काही बोलले. तुम्हाला माझ्या बाबतीत कुठे पुरावा मिळाला. मास्क घालून गेले मिशा लावल्या असे बोलले. सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईल, असे थेट आव्हान त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे. मी खरंतर बोलणार नव्हतो, आम्ही गोर गरिबांसाठी काम करतोय. योजनेच्या बाबतीत माहिती देणार होतो. जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा. शिवशाहीच्या विचारांनी आम्ही काम करतोय, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मी दहावा अर्थसंकल्प सादर केला. माझ्यावर दोन दिवस टीका झाली. अर्थ संकल्प मांडताना निधी नाही, अशी टीका झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा. हा चुनावी जमला आहे, असे म्हणण्यात आले. मात्र, ऑगस्ट महिन्यात दोन महिन्याचे पैसे महिलांना मिळतील. गरीब वर्गाला कशी मदत करता येईल, हाच प्रयत्न केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community