virar hit and run : फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं, आरोपी गजाआड

203
virar hit and run : फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं, आरोपी गजाआड
virar hit and run : फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं, आरोपी गजाआड

विरारमधुन हिट अँड रनचे (virar hit and run) प्रकरण समोर येत आहे. एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आत्मजा कासट (Atmaja kast) असं प्राध्यापिकेचं नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारनं त्यांना धडक दिली.

(हेही वाचा –Crime News : MBBS ची विद्यार्थीनी स्नॅप चॅटवर म्हणाली, ‘आय क्विट’ आणि…)

आलिशान फॉर्च्युनर गाडीनं धडक दिल्यानंतर आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. या अपघातात आत्मजा कासट गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचालकानं त्यांना नजिकच्या रुग्णालयात नेलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे. (virar hit and run)

नेमकं काय घडलं?
विरारमधील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका आत्मजा कासट यांचा गुरुवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरारमध्ये खळबळ माजली आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. तेवढ्यात मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना गाडीनं धडक दिली. आलिशान फॉर्च्युनर गाडीनं धडक दिल्यानंतर आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. या अपघातात आत्मजा कासट गंभीर जखमी झाल्या आहेत. (virar hit and run)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.