-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग असलेली गोल्फपटू दिक्षा डागरच्या गाडीला (Diksha Dagar Accident) ती पॅरिसमध्ये परतत असताना मंगळवारी रात्री अपघात झाला आहे. इंडिया हाऊसमधील कार्यक्रमानंतर ती आणि तिचे कुटुंबीय कारमधून राजधानीत परतत होते. अशावेळी एका कारने तिच्या कारला धडक दिली. सुदैवाने तिला फारशी दुखापत झालेली नाही. तिच्याबरोबर तिचे वडील व कॅडी नरेश डागर, तिची आई व भाऊ हे होते.
(हेही वाचा- Rahul Gandhi: संसदेतील भाषणानंतर राहुल गांधींचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, ट्विट करत म्हणाले…)
किरकोळ दुखापत झालेल्या दिक्षाने ठरल्याप्रमाणे स्पर्धेत खेळणार असल्याचं पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. या अपघाताची बातमी काहीशी उशिराच मीडियापर्यंत पोहोचली. (Diksha Dagar Accident)
I am in Paris @OlympicGolf and met THE @McIlroyRory …The King 👑 of ball striking ⛳️. pic.twitter.com/6O7UIDKEzT
— Diksha Dagar (@DikshaDagar) July 30, 2024
दिक्षाने अपघातातून (Diksha Dagar Accident) सावरल्यानंतर सरावही सुरू केला आहे. आणि ७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. दिक्षाच्या आईच्या पाठीच्या कण्याला थोडा मार लागला आहे. त्यांच्यावर पॅऱिसमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर आहे.
(हेही वाचा- Crime News : MBBS ची विद्यार्थीनी स्नॅप चॅटवर म्हणाली, ‘आय क्विट’ आणि…)
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चौकात रस्ता ओलांडताना अचानक समोरच्या सिग्नलने रंग बदलला. शेजारी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेमुळे मागून येणाऱ्या गाडीला दिक्षाची गाडी दिसली नाही. त्यामुळे ही गाडी दिक्षाच्या गाडीला शेजारी येऊन आदळली. दिक्षा डागरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. येत्या ७ तारखेपासून ते १० तारखेपर्यंत तिची स्पर्धा चालणार आहे. पुरुषांमध्ये गगनजीत आणि शुभंकर यांचे सामने सुरू झाले आहेत. (Diksha Dagar Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community