Wayanad landslides : इथून पळून जा; वायनाडमधील १४ वर्षांच्या मुलीने लिहिलेला निबंध २४ तासांत झाला खरा

227
Wayanad landslides : इथून पळून जा; वायनाडमधील १४ वर्षांच्या मुलीने लिहिलेला निबंध २४ तासांत झाला खरा
Wayanad landslides : इथून पळून जा; वायनाडमधील १४ वर्षांच्या मुलीने लिहिलेला निबंध २४ तासांत झाला खरा

केरळच्या (Kerala) वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता आहेत. या वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आधीच आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती. वायनाड ट्रॅजेडीमध्ये केरळच्या एका १४ वर्षीय मुलीची गोष्ट चर्चेत आली आहे. (Wayanad landslides)

(हेही वाचा – Kalyan Hoarding Collapse: महाराष्ट्रात पुन्हा होर्डिंग कोसळले! ३ वाहनं चिरडली, व्हिडिओ व्हायरल)

काय आहे लहान मुलीची गोष्ट

लाया एएस नावाच्या या मुलीने तिच्याच वयाच्या एका मुलीची गोष्ट लिहिली होती. तिच्या गोष्टीतली मुलगी गावाजवळच्या धबधब्याजवळ जाते आणि त्या धबधब्यात पडून मरते. मात्र तीच मुलगी एक पक्षी बनून गावात परत येते. गावातील लोकांना पुराच्या धोक्याबद्दल सूचित करते. ती पक्षी बनून गावातील मुलांना भेटते व सांगते, “इथून (गावातून) पळून जा. पुढे मोठा धोका आहे”. मुलं देखील तिचं ऐकून पळत सुटतात आणि एका टेकडीजवळ येऊन थांबतात. तिथे टेकडीवरून मोठ्या वेगाने वाहणारं पावसाचं पाणी पाहतात. त्याचवेळी तो पक्षी एका सुंदर मुलीमध्ये रुंपातरीत होतो व काही क्षणात गायब होतो.

मॅग्झीनचा डिजिटल अंक प्रकाशित

शाळेच्या मॅग्झीनसाठी एक गोष्ट लिहिली होती. या मॅग्झीनचा डिजिटल अंक प्रकाशित करण्यात आला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने सांगितलेली गोष्ट खरी ठरली. लायाची ही गोष्ट सोमवारी सकाळी अपलोड करण्यात आली होती. याचे शीर्षक ‘अग्रहतिंते दुरानुभवम’ (इच्छेचे संकट) असे आहे. यामध्ये दोन मुलींचे पात्र रंगविण्यात आले आहे. यात एक बोलणारी चिमणी या गावावर मोठे संकट येणार आहे, पळून जा, असे सांगत आहे.

प्रत्यक्षातही लायाच्यात गावावर संकट आले आहे. वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याने वेल्लारमाला सरकारी शाळाही वाहून गेली. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. याच शाळेचे हे मॅग्झीन होते. ते डिजिटली उपलब्ध झाल्याने लोकांच्या वाचनात आली आणि हा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे या भूस्खलनात लायाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. एक काल्पनिक गोष्ट खरी ठरली आहे. (Wayanad landslides)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.