भारताची आर्थिक राजधानी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत नागरिक वाहतूक कोंडीने (Mumbai Traffic) त्रस्त आहेत. तसेच जानेवारी ते जून या सहा महिन्यात शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ हजार १३४ नव्या वाहनांची भर पडल्याने शहरातील वाहतूकी कोंडी वाढत आहे. गेल्या सहा महिन्यातील नवीन वाहनांमुळे शहरातील वाहनांची गर्दी १५ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत सध्या ४८ लाख वाहने रजिस्टर आहेत. (Mumbai Vehicle congestion)
मुंबई शहरातील प्रत्येक रस्त्यांवर सध्याच्या घडीला वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आहे. मुंबई शहरात दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. शहरात सध्या सुमारे २५ टक्के रस्त्यांचे काम सुरु आहे. यामुळे शहरात वाहतूकीच्या कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. (Mumbai Vehicle congestion)
(हेही वाचा –Sharad Pawar यांच्याकडूनच आम्ही घरफोडीचे राजकारण शिकलो; धर्मराव बाबा आत्राम यांचा हल्लाबोल )
आशातच शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचा प्रवास वेळ वाढला आहे. रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे मुंबईकरांना सर्वाधिक वेळ वाहतूकीत खर्च करावा लागतो. (Mumbai Vehicle congestion)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community