MVA Conflict : ‘मविआ’त जागावाटप कळीचा मुद्दा; शरद पवार काँग्रेस-उबाठाला देणार झटका?

168
Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेसने शरद पवार यांना हलक्यात घेतल्याचे दिसते. राज्यातील विधानसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदार संघांपैकी काँग्रेस आणि उबाठा प्रत्येकी १०० हून अधिक जागा लढण्याची तयारी करत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची फक्त ८० जागांवर बोळवण करण्याचे ठरले असल्याचे समजते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षात याबाबत नाराजीचा सूर उमटत असून जागावाटप हा आघाडीत कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (MVA Conflict)

पवारांचा ‘स्ट्राइक रेट’ अधिक

लोकसभा निवडणुकीला ‘मविआ’मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा ‘स्ट्राइक रेट’ चांगला राहिला आहे तर त्याखालोखाल काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या उबाठाचा अत्यंत सुमार दर्जाचा राहिला. उबाठाने दादागिरी करत ४८ पैकी २१ जागा मिळवल्या मात्र केवळ ९ जिंकल्या, काँग्रेसने १७ लढत १३ जिंकल्या तर राष्ट्रवादीने (शप) फक्त १० जागा लढून ८ वर विजय मिळवला. त्यामुळे विधानसभेला जागावाटप करताना या ‘स्ट्राइक रेट’चा विचार निश्चित व्हायला हवा, असा आग्रह शरद पवार गटांकडून होत आहे. (MVA Conflict)

(हेही वाचा – Mumbai Vehicle congestion: मुंबईत वाहनांची गर्दी १५ टक्क्यांनी वाढली; वाहतुकीचे गणित बिघडले)

८ जागांवर घटक पक्ष

लोकसभेला आम्ही आघाडी टिकवण्यासाठी जागांवर वाद न घालता तडजोड केली, असे मत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले. तरीदेखील उबाठाकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मुंबईसह राज्यात सर्वाधिक जागा घेण्यासाठी आटापिटा सुरू झाला असल्याची चर्चा आहे. उबाठाकडून १२० जागांची मागणी होत आहे तर काँग्रेसने देखील १२५ जागांवर उमेदवार उभे करण्याची भाषा सुरू केली आहे. अखेर किमान १००-१०० जागांवर काँग्रेस आणि उबाठाचे एकमत झाल्यास शरद पवार यांच्या गटाला ८० आणि उर्वरित ८ जागांवर घटक पक्ष, असे जागावाटप होण्याची शक्यता आहे. (MVA Conflict)

‘जोर का झटका’

शरद पवार गटात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून पवार यांनी पक्षातील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस आणि उबाठाला ‘जोर का झटका’ देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत असून काँग्रेस आणि उबाठा पवारांना हलक्यात घेत असल्याची भावना पक्षातील नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे. (MVA Conflict)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.