BMC : महापालिका मुख्यालय इमारतीची देखभाल योग्यप्रकारे, भारताचे युनेस्कोतील राजदूतांनी केले हेरीटेज वॉक

138
BMC : महापालिका मुख्यालय इमारतीची देखभाल योग्यप्रकारे, भारताचे युनेस्कोतील राजदूतांनी केले हेरीटेज वॉक

मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयाची इमारत जगातील महत्त्वपूर्ण वारसास्थळांपैकी एक आहे. या वास्तूचे ऐतिहासिक आणि नागरी महत्त्व महानगरपालिका प्रशासनाने उत्तमप्रकारे जपले असून इमारतीची देखभालही चांगल्या प्रकारे करत आहेत, असे गौरवोद्गार ४६ व्या युनेस्को जागतिक वारसा स्थळ समितीचे अध्यक्ष आणि भारताचे यूनेस्को तील राजदूत विशाल शर्मा यांनी केले आहे. शर्मा यांनी महापालिका मुख्यालय इमारतीत हेरिटेज वॉक करून या वास्तूची पाहणी केली, त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी हे गौरवोद्गार काढले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ४६ व्या युनेस्को जागतिक वारसा स्थळ समितीचे अध्यक्ष आणि भारताचे यूनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांचे महानगरपालिका मुख्यालयात स्वागत केले. त्यानंतर विशाल शर्मा आणि अतिरिक्त महानगरपालिका (BMC) आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचा हेरिटेज वॉक केला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याचे मयूर ठाकरे उपस्थित होते. महानगरपालिकेचे पुरातन वास्तू जतन खात्याचे अभियंता संजय आढाव आणि त्यांच्या चमूने या हेरिटेज वॉकदरम्यान महानगरपालिका मुख्यालय इमारतीची संकल्पना, रचना, वास्तुशैली, स्थापत्य आदींबाबत शर्मा यांना सविस्तर माहिती दिली. वास्तू पाहून तसेच त्याबद्दलची माहिती ऐकून विशाल शर्मा भारावून गेले.

(हेही वाचा – एसी आणि एसटी आरक्षणासंबंधी Supreme Court च्या निर्णयाला सदावर्ते आव्हान देणार)

दरम्यान, महानगरपालिका सभागृहातही शर्मा यांनी भेट दिली आणि सभागृहातील शिल्पकला, कोरीव काम तसेच पेंटींग्ज पाहूनही महानगरपालिका प्रशासनाचे कौतूक केले. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक इमारतीची वास्तुकला, स्थापत्य रचना आणि देखभाल पाहून शर्मा भारावून गेले. जागतिक वारसास्थळ असलेल्या या इमारतीचे महानगरपालिका प्रशासनद्वारे उत्तम प्रकारे जतन केले जात असून हे प्रशंसनीय कार्य असल्याचे गौरवोद्गारही शर्मा यांनी यावेळी काढले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.