मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या (Shri Krishna Janmabhoomi) प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळून लावत हिंदूंच्या बाजूने दाखल केलेल्या सर्व १८ याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी होईल, असे सांगितले. पुढील सुनावणी १२ ऑगस्टला होणार आहे.
या संदर्भात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर ६ जून या दिवशी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या याचिकांद्वारे हिंदूंनी ‘शाही ईदगाहाची जागा हिंदूंची असून ती हिंदूंना परत देण्यासह तेथे पूजा करण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी हिंदु पक्षाने दाखल केलेल्या याचिकांमध्ये शाही इदगाह मशिदीची जमीन हिंदूंची भूमी (Shri Krishna Janmabhoomi) असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
(हेही वाचा एसी आणि एसटी आरक्षणासंबंधी Supreme Court च्या निर्णयाला सदावर्ते आव्हान देणार)
त्याच वेळी मुसलमान पक्षाने प्रार्थना स्थळ कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१), वक्फ कायदा आदी कायद्यांचा संदर्भ देऊन हिंदूंच्या याचिका फेटाळण्यासाठी युक्तीवाद केला होता. मथुरा न्यायालयात हिंदु पक्षाकडून दाखल करण्यात आलेले १८ स्वतंत्र दिवाणी दावे कायम ठेवण्याला आव्हान देण्यात आले होते. शाही ईदगाह समितीने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाला १८ याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार कि नाही?, हे ठरवायचे होते. यावर निर्णय देतांना सुनावणी चालूच रहाणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. (Shri Krishna Janmabhoomi)
Join Our WhatsApp Community