EPFO : भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध

2944
EPFO : भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध

महाराष्ट्र राज्याचे वर्ग-४ शिवायचे कर्मचारी, ज्यांचे भविष्य निर्वाह निधी (EPFO) लेखे कार्यालय प्रधान महालेखाकार (ले. व ह.) -११, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयात ठेवले जातात, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२३-२४ चे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व.ह)-II, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयाच्या वेबसाइट तथा महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत, असे वरिष्ठ उप महालेखाकार (निधी), कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व ह.) यांनी प्रसिद्धपत्राद्वारे कळवले आहे.

कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधी (EPFO) लेख्यांचे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार (ले. व ह.) II, महाराष्ट्र, नागपूरच्या वेबसाइट लिंक https://smswebservicesagaemaharashtra2.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login वर पाहु शकतात. कर्मचारी आपले वार्षिक विवरण फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये डाउनलोड पाहण्यासाठी/व प्रिंट करण्यासाठी https://sevaarth.mahakosh.gov.in/ या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पाहू शकतात. महाराष्ट्र राज्याचे सर्व कर्मचारी, ज्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे या कार्यालयात ठेवले जातात, त्यांनी कृपया खालील मुद्द्यांचे अनुपालन करावे जेणेकरून नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांचे समायोजन करून सेवानिवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळता येईल.

(हेही वाचा – मोदी सरकार शेतकऱ्यांना व्होट बँक नव्हे तर देव मानते; Shivraj Singh Chauhan यांचा दावा)

असा करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ मे २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाइल क्रमांक कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व.ह)-II, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयात नोंदणी कृत करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPFO) लेख्यामधील जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रिम राशि तसेच भविष्य निर्वाह निधी अंतिम आहरणच्या आवेदनाची प्राप्ती तसेच त्याच्या प्राधिकृत होण्यासंधीचा संदेश या कार्यालयाद्वारा पाठवला जाऊ शकेल. ज्या कर्मचाऱ्यांनी अजुन आपला मोबाइल क्रमांक या कार्यालयात नोंदणीकृत केला नसेल त्यांनी आपला मोबाइल क्रमांक [email protected] ह्या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे व. लेखा अधिकारी/निधी विविध यांना आपले पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ आयडीसह पाठवावा.

सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव व जन्म तारीख भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र (EPFO) तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावेत, तफावत असल्यास आपले नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करून संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे आपले बरोबर असलेले नाव व जन्म तारीख या कार्यालयाच्या अभिलेख्यामधे दुरुस्त करण्यासाठी कर्मचार्याच्या सेवार्थ_आयडी (Sevaarth_ID) सह [email protected] वर ई-मेल पाठवावा. कृपया सर्वांनी हे सुनिश्चित करावे की सेवार्थ प्रणाली तसेच भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रात अभिदात्याचे पूर्ण नाव नमूद केले आहे. लवकर माहिती साठी <[email protected]> वर ई-मेल पाठवावा. कर्मचारी या कार्यालयाच्या वेबसाइटवर https://smswebservicesagaemaharashtra2.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/logi लॉगइन केलेल्या आपल्या भविष्य निर्वाह निधी लेख्याची सद्यस्थिती पाहू शकतात. वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी, तुमचा मोबाइल क्रमांक या कार्यालयात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड नसल्यास, ‘Forgot Password’ या आयकॉन वर क्लिक केल्यानंतर, तुमचा जीपीएफ खाते क्रमांक प्रविष्ट करून आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एस.एम.एस. द्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. कृपया भविष्य निर्वाह निधी अनुसूचिमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सीरीज व पूर्ण नाव बरोबर लिहिलेले आहे हे सुनिश्चित करावे. जर मासिक अभिदानाची राशी किंवा घेतलेल्या अग्रिमाची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झालेली नसल्यास, सम्बंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातुन कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांक, अनुसूची/प्रमाणकाची राशी, अनुसूचीच्या प्रती बरोबर पाठवावे, जेणेकरुन नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांची लेख्यामधे नोंद होईल व भविष्यात सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधीची राशी प्राधिकृत करताना होणारा विलंब टाळता येईल. चांगल्या सेवेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन, वरिष्ठ लेखाधिकारी/लेखा निधी विविध यांनी प्रसिद्धपत्राद्वारे केले आहे. (EPFO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.