नैमिषारण्यामध्ये एका कुंडावर बांधलेले हे ललिता देवी मंदिर, काय आहे वैशिष्ट्ये? जाणून घ्या

नैमिषारण्यामध्ये अनेक लहान मोठी तीर्थस्थाने अथवा मंदिरे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे ललिता देवीचे मंदिर.

छायाचित्र : दिवाकर नेने

या मंदिराचे वेगळेपण म्हणजे, हे मंदिर एका लहानशा कुंडावर बांधले आहे.

छायाचित्र : दिवाकर नेने

या मंदिरात ललिता देवी तसेच भुवनेश्वरी देवीची मंदिर आहेत त्याचबरोबर श्रीविष्णूची सुद्धा एक फार जुनी अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.

छायाचित्र : दिवाकर नेने

तसेच येथे 'रुद्रावर्त तीर्थ' म्हणून एक पवित्र ठिकाण आहे जे गोमती नदीच्या काठावर आहे. 

या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर जरी नदीच्या काठावर असले तरी नदीमध्ये आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते.

छायाचित्र : दिवाकर नेने

पाणी स्वच्छ असल्यामुळे आपण ते शिवलिंग बघू शकतो. लोकं तिथे जो प्रसाद घेतात तो या पाण्यात शिवलिंगाला वाहतात

प्रसाद फळांच्या स्वरूपात असतो तो पाण्यातून वर आला तर आशीर्वाद समजून भाविक परत घेतात.