Hawkers : पहिल्या टप्प्यात मुंबईतील २० ठिकाणे फेरीवालामुक्त; रेल्वे स्थानकांसह लांबच्या परिसरांचाही समावेश

3827
Hawkers : पहिल्या टप्प्यात मुंबईतील २० ठिकाणे फेरीवालामुक्त; रेल्वे स्थानकांसह लांबच्या परिसरांचाही समावेश

मुंबईत मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई तीव्र करण्यात आली असून एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकांपासून १५० मीटरचा परिसर फेरीवालामुक्त करण्याची आवश्यक असताना, या अंतरापासून दूरवर असलेल्या फेरीवाल्यांविरोधातही ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे फेरीवाले आता आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहेत. परंतु सध्या मुंबईत सुरु असलेली कारवाई पोलिसांच्या निर्देशानुसारही सुरु असून पहिल्या टप्प्यात महापालिकेने २० ठिकाणे निश्चित केली आहेत. ज्यात रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या ठिकाणांसह दूरच्या ठिकाणांचाही समावेश आहे. या २० ठिकाणांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे, अंधेरी, मालाड, बोरीवली, दहिसर, कुर्ला, घाटकोपर आदी रेल्वे स्थानकाच्या जवळील परिसरांचा समावेश आहे. तर कुलाबा कॉजवे, लालबाग राजा परिसर, वांद्रे लिकींग रोड, हिल रोड, मोहम्मद अली मार्ग लालबहादूर शास्त्री मार्ग आदी रेल्वे स्थानकांपासून दूर असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Marathi Sahitya Sammelan : ९८ व्या संमेलनासाठी नवी दिल्लीत स्थळ पाहणी)

दरम्यान, लालबागमधील फेरीवाल्यांवर (Hawkers) होणाऱ्या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या मराठी आणि स्थानिक फेरीवाल्यांनी महापालिकेच्या निषेध करत शुक्रवारी आंदोलन केले. महापालिकेच्या या कारवाईमुळे फेरीवाला व त्यांचे कुटुंबिय यांच्या नावावर उपासमारीचे संकट आल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या अडचणी विचारात घेऊन दिलासा दयावा असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार केली जात आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांच्या परिसरांसह रेल्वे स्थानकांपासून लांब असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये लालबाग राजाचा परिसराचाही समावेश आहे. जून महिन्यांमध्ये पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलिसांनी या सूचन केल्या होत्या. त्यामध्ये लालबागचा राजा परिसरात, चिवडा गल्लीत बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे गर्दी होत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हा परिसर फेरीवालामुक्त करावा अशी सूचना पोलिसांची होती, त्यानुसार ही कारवाई महापालिकेच्यावतीने केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. (Hawkers)

(हेही वाचा – Temple : सरकारने देवस्थानाला इनाम दिलेली जमीन कब्जेदारांच्या मालकीला मंदिर महासंघाचा विरोध)

मुंबईतील ही २० ठिकाणे राहणार फेरीवालामुक्त
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर
  • चर्चगेट उच्च न्यायालय परिसर
  • कुलाबा कॉजवे
  • दादर रेल्वे स्थानक पश्चिम बाजू
  • दादर रेल्वे स्थानक पूर्व बाजू
  • दादर टी टी परिसर
  • लालबागचा राजा परिसर
  • अंधेरी पश्चिम बाजू
  • अंधेरी पूर्व बाजू
  • कांदिवली मथुरादास रोड
  • मालाड रेल्वे स्थानक पश्चिम बाजू
  • बोरीवली रेल्वे स्थानक पश्चिम
  • दहिसर भरुचा मार्ग
  • कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम
  • वांद्रे लिकींग रोड पश्चिम
  • वांद्रे पश्चिम हिल रोड
  • घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम दिशा
  • बी विभागातील लोकमान्य टिळक मार्ग
  • मोहम्मद अली मार्ग
  • लालबहादूर शास्त्री मार्ग (Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.