मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार; CM Eknath Shinde यांची ग्वाही

158
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार; CM Eknath Shinde यांची ग्वाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यासाठी सरकारने एक वर्षापासून नियोजन केलेले असल्याने ही निवडणुकीसाठी नसून विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले तरी ही योजना कायमस्वरूपी सुरूच राहील अशी ठाम ग्वाही देतानाच, लेक लाडकी योजना आठ-नऊ महिन्यांपूर्वी सुरु केली तेव्हा काय निवडणुका होत्या का, असा परखड सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी (२ ऑगस्ट) एका जाहीर कार्यक्रमात विरोधी पक्षांना चांगलेच फटकारले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बहिणींना महिन्याला १५०० रुपये तर वर्षाला १८००० रुपये मिळणार आहेत. जर एका घरात दोन बहिणी असतील तर वर्षाला त्या घरात ३६००० रुपये मिळणार आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या विविध योजनांमधून राज्यातील २ कोटी महिलांना लाभ मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी बोलताना केला.

(हेही वाचा – Mumbai Under Water: २०४० पर्यंत दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार? जाणून घ्या  तज्ज्ञांनी कारणही सांगितले)

कपटी आणि सावत्र भावांपासून सावध रहा

लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून काही सावत्र भावांच्या डोळ्यात ही योजना खुपू लागल्याने काही नतद्रष्ट लोकं या योजनेसाठी कोर्टात जाऊन स्टे घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा उद्धव ठाकरे यांना टोला लगावत आपल्या लाडक्या बहिणींना कोर्टही न्याय देईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी अशा कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावे, असे आवाहन करत या योजनेत सर्व जातीपातीच्या महिलांना लाभ मिळणार असून अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी ४६००० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ‘महायुती सरकारचा इरादा नेक, सुरक्षित ठेवणार बहीण आणि माझी लेक’ अशी घोषणा देत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला.

दोन वर्षांपूर्वी आम्ही महाविकास आघाडीचे नाकाम सरकार उलथवून टाकले होते. आता जनता सुज्ञ असून घरी बसणाऱ्यांना नाही तर लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना निवडून देते, असे सांगत महाविकास आघाडी व्देषाचे आणि सुडाचे राजकारण करत आहेत. मात्र महायुती सरकार सुखाचे आणि समृद्धीचा मंत्र घेऊन काम करत असल्याचाही ठाम दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. घटनाबाह्य मुख्यमंत्री अशी टीका करणारे आता त्यांच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोर्ड लावत आहेत आणि फॉर्म भरुन घेत असून अशा लोकांपासून महिलांनी सावध राहावे. कारण सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय आणि ऑनलाईन अर्ज स्वीकृती केली जात आहे, अशाच ठिकाणी महिलांनी अर्ज सादर करावे, असेही खुले आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.