जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली याचा निषेध मी करतो. मात्र कुठल्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलतांना सांभाळून बोलले पाहिजे. ते मोठे नेते असले तरी मी व्यक्तिगत नागरीक म्हणून इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आव्हाड साहेब पुरोगामी विचारासाठी लढत आहेत मात्र बोलताना काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आव्हाडांना दिला.
विशाळगडावील तोडफोडीनंतर लागलीच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तोडफोड करणारी मुले संभाजी भिडे गुरुजी यांचे अनुयायी होते, असा बिनबुडाचा आरोप आव्हाडांनी केला होता. त्यामुळे राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या (Jitendra Awhad) गाडीवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबत यावे अशी साद महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना घातली होती. मात्र यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी आपल्या आजोबांचा इतिहास तपासावा असा खोचक सल्ला दिला होता. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रकाश आंबेडकर कोणता इतिहास सांगतात? ते मला माहित नाही. मात्र पवार साहेबांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राचा विकास हा त्यांच्या काळातच झालेला आम्ही पाहिलेला आहे. भेदभाव त्यांनी कधी केला नाही. विकास करत असताना केंद्र सरकारकडूनही मोठा निधी शरद पवार यांनी आणला आहे. आता शरद पवारांच्या कुठल्या कामाकडे पहा असे प्रकाश आंबेडकर सांगत आहेत हे मला सांगता येत नाही. मात्र महाराष्ट्रात सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र घेत भेदभाव न करता जो विकास केला तो आम्ही पाहिला आहे, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community