Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे मराठीमधील अर्ज मंजूर होणार!

219
Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे मराठीमधील अर्ज मंजूर होणार!
Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे मराठीमधील अर्ज मंजूर होणार!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे (Ladki Bahin Yojana) अर्ज मोठ्या संख्येने जमा होत आहेत. दरम्यान, या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज मंजूर होणार आहेत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकाराले जाणार

आदिती तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतु ही तांत्रिक अडचणी संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकाराले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये,असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. (Ladki Bahin Yojana)

वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून पात्र ठरणाऱ्या महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.