Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक 

Paris Olympic 2024 : उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे  

111
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक 
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक 
  • ऋजुता लुकतुके

यंदा बॅडमिंटनमध्ये भारताचे सात खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. हा एक उच्चांक आहे. पण, हळू हळू बाद फेरीत एकेक खेळाडू बाद होत गेले. त्यातच चौथ्या फेरीत लक्ष्य सेन आणि एच एस प्रणॉय या दोघा भारतीय खेळाडूंनाच आमने सामने यावं लागलं. त्यामुळे एक भारतीय जिंकला हे जरी खरं असलं तरी दुसरा स्पर्धेतून बाद झाला. अशावेळी सात पैकी एकच खेळाडूची उपउपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला याचं शल्य शुक्रवारपर्यंत चाहत्यांना होतं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Ind vs SL, 1st ODI : भारत आणि श्रीलंकेची नाट्यपूर्ण बरोबरी )

पण, २२ लक्ष्य सेनने (Lakshya Sen) शुक्रवारी रात्री नूर पालटून टाकला आहे. चीन तैपेईच्या चाऊ तीन चेन या तगड्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान १९-२१, २१-१६ आणि २१-१२ असं मोडून काढत लक्ष्यने चक्क उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी फक्त सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू या इतर दोन बॅडमिंटनपटूंनीच उपउपांत्य फेरीचा अडथळा पार केला आहे. (Paris Olympic 2024)

 चाऊ चेन हा यापूर्वी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. लक्ष्य विरुद्ध त्याने सुरुवातही चांगली केली. पहिल्या गेममध्ये १८-१८ अशा बरोबरीनंतर लक्ष्यची एकाग्रता थोडी ढळली. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नांत तो पुढचे दोन गुण गमावून बसला. त्यामुळे पहिला गेम त्याने १९-२१ असा गमावला. पण, या पिछाडीनंतरही लक्ष्यने उमेद सोडली नाही. वेग, अचूकता आणि योग्य रणनीती याच्या जोरावर सामन्यात पुनरागमन केलं. (Paris Olympic 2024)

दुसरा गेम त्याने २१-१६ ने जिंकला. त्याचा प्रतिस्पर्धी चाओ हा जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर आहे. तर लक्ष्य २२ व्या. पण, रणनीती आणि वेगाच्या आधारावर लक्ष्यने चाओला झुंजवलं. हा एकूण सामना ७५ मिनिटं चालला. आणि शेवटी शेवटी चाओची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे तो तिसऱ्या गेममध्ये लक्ष्यला लढत देऊ शकला नाही. हा गेम लक्ष्यने २१-१२ असा सहज जिंकला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- BSF Officers : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय! वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे बीएसएफच्या महासंचालकांना पदावरून हटवलं)

आता उपांत्य फेरीत लक्ष्यची गाठ माजी ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्लेससनशी पडणार आहे. व्हिक्टरने आपल्या उपान्त्यपूर्व सामन्यात प्रतिस्पर्ध्याला सरळ दोन गेममध्ये हरवलंय. त्यामुळे तो ताजातवाना असेल. त्याची उंची हे त्याचं बलस्थान आहे. लक्ष्यसाठी या ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त कस एक्सेलसनविरुद्ध लागणार आहे. हा सामना रविवारी होईल. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.