-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024 ) शुक्रवारी दोन निकाल खूप महत्त्वाचे ठरले. लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये एकेरीत उपांत्य फेरी गाठली. भारतीय हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३-२ असं हरवलं. याशिवाय मनू भाकेरने २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी गाठली. एव्हाना आपल्याला तिच्या कामगिरीची सवय झाली आहे.
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : मनु भाकरची २५ मीटर अंतिम फेरी; दीपिका कुमारी, भजन कौर यांना अखेरची संधी )
पण, लक्ष्य आणि हॉकी संघाने कामगिरीत दाखवलेलं सातत्य त्यांच्याबद्दल आशा निर्माण करणारं आहे. पैकी हॉकी संघाने गेली ५२ वर्षं जे जमलं नव्हतं ते करून दाखवलं. त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३-२ ने हरवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. तसंच आक्रमण आणि बचाव यांचा चांगला मिलाफ दाखवला. आपलं शेवटचं ऑलिम्पिक खेळणाऱ्या श्रीजेशने किमान एक डझन आक्रमणं गोलजाळ्यापाशी अडवली. त्यालाही हा विजय कायम लक्षात राहील. (Paris Olympic 2024 )
शिवाय अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) यांनी आधीच्या सामन्यापासूनच पुन्हा सुरू केल्यासारखं आक्रमण दाखवून दिलं. (Paris Olympic 2024 )
My history is admittedly terrible but I cannot remember the last time the Indian Men’s Hockey Team has beaten Australia at an Olympics or the World Cup in like 40-50 years. What a win!!! Congrats boys. Heart stopping at the end.
Ind 3-2 Aus#Olympics #Paris2024 #Hockey
— Viren Rasquinha (@virenrasquinha) August 2, 2024
तेराव्या मिनिटाला हरमनप्रीतने पहिला गोल केला. लागोपाठ अभिषेक शर्माने गोल करत भारतीय संघाला पहिल्या क्वार्टरमध्येच २-० अशी तगडी आधाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियन संघानेही हार मानली नव्हती. १९ व्या मिनिटाला त्यांनी पहिला गोल केला. तिसरा क्वार्टर दोन्ही संघांनी एकमेकांना आजमावण्यात गेला. पण, हरमनप्रीतने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना सामन्यातील दुसरा आणि स्पर्धेतील सहावा गोल केला. ऑस्ट्रेलिया बरोबरीचा प्रयत्न करणार त्यापूर्वीच भारताला ३-१ ने आघाडी मिळवून दिली. (Paris Olympic 2024 )
Breaking a 52-year spell, our Indian hockey team has triumphed over Australia at the #Olympics !
Their hard work & passion have brought glory to the nation.
Best of luck for the upcoming match—we’re all cheering for you!#Cheer4Bharat pic.twitter.com/BIeSUm0MEb— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 2, 2024
मग चौथ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या रोहरने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. पण, तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. एकंदरीत हा सामना रंगतदार झाला. ऑस्ट्रेलियासारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारतीय संघाने वर्चस्व राखत तो जिंकला. या विजयासह भारतीय संघ ब गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताची उपांत्य फेरीत गाठ ग्रेट ब्रिटनशी पडणार आहे. हा सामना रविवारी होईल. (Paris Olympic 2024 )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community